अल्पवयीन मैत्रिणीला वाढदिवशी‎ घरी बोलावून केला बलात्कार‎: अश्लील‎ फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी‎. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 24, 2023

अल्पवयीन मैत्रिणीला वाढदिवशी‎ घरी बोलावून केला बलात्कार‎: अश्लील‎ फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी‎.

 अल्पवयीन मैत्रिणीला वाढदिवशी‎ घरी बोलावून केला बलात्कार‎: अश्लील‎ फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी‎.


नाशिक -
 अल्पवयीन मैत्रिणीला‎ वाढदिवसानिमित्त घरी बोलावून‎ संशयिताने बलात्कार करुन अश्लील‎ फोटो मोबाईलमध्ये काढून फोटो‎ व्हायरल करण्याची धमकी‎ दिल्याप्रकरणी संशयित‎ युवकाच्याविरोधात अंबड पोलिस‎ ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ पोलिसांनी दिलेली माहिती आणि‎ पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार,‎ संशयित स्वयंम कमलेश बनकर‎ रा. तिडके नगर उंटवाडी याचा‎ वाढदिवस असल्याने त्याने‎ मैत्रीणीला वाढदिवसाची पार्टी‎ देण्याकरीता घरी बोलवले होते. घरात‎ कुणी नसल्याने संशयिताने मुलीवर‎ अतिप्रसंग केला. या प्रसंगाचे‎ मोबाईल मध्ये फोटो व्हिडीओ केला.‎ मुलीने आरडाओरड केली असता‎ संशयिताने फोटो व्हायरल करण्याची‎ धमकी दिली. वरीष्ठ निरीक्षक सुरज‎ बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली‎ तपास सुरू आहे.‎

No comments:

Post a Comment