दारुच्या नशेत बापाने केले मुलावर चाकुने जीवघेणे वार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 24, 2023

दारुच्या नशेत बापाने केले मुलावर चाकुने जीवघेणे वार.

 दारुच्या नशेत बापाने केले मुलावर चाकुने जीवघेणे वार.

पत्नीची पती विरूद्ध फिर्याद, आरोपी बापाला चार दिवसाची पोलिस कोठडी.


पारनेर -
पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथील रविंद काळे यांनी दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करत आसताना सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या दोन मुलांवर चाकुने वार करत जखमी केले असुन आरोपी काळे यास पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
याबाबत रेखा रविंद काळे रा. गटेवाडी ता. पारनेर यांनी  सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार  दि. २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजेचे सुमारास मी माझे पती रविंद्र व दोन मुले अभय व आकाश असे घरी असताना  माझे पती रविंद्र हे दारु पेवून  घरी आले व मला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण करू लागल्याने मी माझ्या मुलांना घेवून माझे दिर आदीक अर्जुन काळे  यांचे घरी घेवून आले त्यानंतर काही वेळात माझे पती रविंद्र हे आमचे मागोमाग येथे ७ वा. सुमारास माझे दीराचे घरी आले व मला तेथेही मारहाण करू लागल्याने माझे पती रविंद्र यांना तुम्ही आईला मारू नका असे म्हणून माझे दोन मुले मला त्यांच्या मारापासून सोडवत असताना त्याचा त्याला राग आल्याने त्यांनी माझे दोन्ही मुले व मला शिवीगाळ करून मारहाण करू लागले त्यावेळेस माझी मुले माझे पतीला विरोध करीत असताना माझे पती म्हणाले की, तुमचा एकएकाचा खुन करतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे खिशातून चाकू काढून माझे दोन मुले अभय व अक्षय यांना छातीला व पोटाला जोरात मारून गंभीर जखमी केले. माझे पती हे रविंद्र हे दारू पिलेले असल्याने आमच्या झालेल्या भांडणामध्ये त्यांचा तोल जावून ते खाली पडून त्यांच्या डोक्याला देखील मार लागून जखमी झाले आहे माझे दोन्ही मुले हे माझे पती यांनी त्यांना चाकूने मारहाण केल्याने गंभीर जखमी झाल्याने आम्ही माझ्या मुलांना ताबडतोब निरामय हॉस्पीटल सुपा येथे औषधोपचारकानी घेवून गेलो तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील औषधोपचार कामी अहमदनगर येथे घेवून जाण्यास सांगितल्याने आम्ही तात्काळ निरामय हॉस्पीटल सुपा येथून माझे मुले अभय व आकाश यांना घेवून माझे दीर आदीक अर्जुन काळे हे अहमदनगर येथे जावून त्यांना पॅसिफिक हॉस्पीटल अहमदनगर येथे औषधोपचार कामी दाखल केले आहे.
 माझी माझे पती रविंद्र अर्जुन काळे यांचे विरुद्ध  फिर्याद दिली  आहे.
सुपा पोलिसांनी रेखा काळे यांच्या फिर्यादीवरुन रविंद काळे यांच्या विरुध्द  ३०७  कलमाअवे गुन्हा दाखल केला असुन आरोपी रविंद्र काळे यास मंगळवारी पारनेर न्यायालयात हजर केले  आसता  न्यायालयाने  त्यास २६ मे  पर्यंत  पोलिस कोठडी दिली असुन पुढील तपास  सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक  ज्योती गडकरी स्वतः करत  आहेत. दोन्ही जखमींवर अहमदनगर येथील खाजगी  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment