नगर मधील घटना: मित्रांकडून मित्राला लुटण्याची सुपारी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 23, 2023

नगर मधील घटना: मित्रांकडून मित्राला लुटण्याची सुपारी.

 नगर मधील घटना: मित्रांकडून मित्राला लुटण्याची सुपारी.


अहमदनगर :
कोयत्याचा धाक दाखवून मित्रालाच लुटण्याच्या कटात सामील असलेल्या एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कर्ज फेडण्यासाठी तीन मित्रांनी मिळून त्यांच्याच मित्राला लुटण्याची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सुपारी देणार्या तिन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लुटणारे दोन आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
सूरज सुनील नायकवाडी (वय 17, रा. शिंदेगल्ली, माळीवाडा) व त्याचा मित्र गणेश शंकर बहीरट हे दोघे 19 मे रोजी दुचाकीवरून जात असताना दोन जणांनी मागून येत त्यांना धक्का दिला. दुचाकीचे नुकसान भरून देतो असे सांगून दोघांनाही काही अंतरावर सोबत घेऊन गेले व कोयत्याच्या धाकावर सूरजच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या. कोतवाली पोलिस ठाण्यात सूरजने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, हा गुन्हा सूरजच्या तीन मित्रांनीच कट रचून केल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली असता कर्ज फेडण्यासाठी लुटीची सुपारी दिल्याची कबुली त्यांनी दिली. लुटीतील ऐवज हा त्यांचा मित्र अभिनव विजय सब्बन (रा.सावेडी) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ अभिनयला अटक केली असून, न्यायालयाने त्याला मंगळवार (दि.23) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment