कोविड 19 मध्ये मृत्यू पावणार्‍या मनपाच्या दोन कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये धनादेशाचे वाटप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

कोविड 19 मध्ये मृत्यू पावणार्‍या मनपाच्या दोन कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये धनादेशाचे वाटप.

 कोविड 19 मध्ये मृत्यू पावणार्‍या मनपाच्या दोन कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये धनादेशाचे वाटप.

कोविड संकट काळात मनपा कर्मचार्‍यांचे कार्य कोतुकास्पद - महापौर रोहिणीताई शेंडगे.


नगर :
कोविड 19 या महाभयंकर संकट काळामध्ये महापालिका कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले. यामध्ये 19 कर्मचारी दुर्दैवी मृत्युमुखी पडले. त्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला त्यानुसार 14 कर्मचार्‍यांचे सात कोटी रुपये महापालिकेकडे सुपूर्त करण्यात आले आहे. यापैकी कै. विजय बोधे व कै. शंकर भागानगरे या कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे. कोविड 19 महाभयंकर संकट काळामध्ये मनपा कर्मचार्‍यांचे कार्य कौतुकास्पद होते असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.  
कोविड 19 अंतर्गत दुर्दैवी मृत्यू पावणार्‍या मनपाच्या दोन कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये धनादेशाचे वाटप महापौर रोहिणी ताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, नगरसेवक शामआप्पा नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, अनिल लोंढे आदी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, महाभयंकर कोविड संकट काळामध्ये माणूस माणसांपासून लांब गेला होता संपूर्ण जग घरामध्ये बसून होते मात्र मनपा कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून स्वच्छतेचे काम करत होते. त्याचबरोबर पाणी वाटप, दिवाबत्ती, आरोग्याच्या सुविधा आदीसह मूलभूत प्रश्न सोडवण्याचे काम केले जात होते. यामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना 19 कर्मचारी दुर्दैवी मृत्यू पावले. त्यांच्या वारसांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment