लोकसभेसाठी भाजप-शिंदे सेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदेकडून इतक्या जागांची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

लोकसभेसाठी भाजप-शिंदे सेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदेकडून इतक्या जागांची मागणी.

 लोकसभेसाठी भाजप-शिंदे सेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदेकडून इतक्या जागांची मागणी.


मुंबई - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहेत, अशातच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण असे आहे की, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो. यावर पक्ष विस्तारासाठी सातत्याने आक्रमक भूमीकेत असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, लोकसभेच्या 22 जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी 13 खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकामी उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने तयारी केली जाईल. लोकसभेच्या या 22 जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.

No comments:

Post a Comment