या कारणामुळे आईसह, पत्नीची हत्या करत पती फरार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 23, 2023

या कारणामुळे आईसह, पत्नीची हत्या करत पती फरार..

 या कारणामुळे आईसह, पत्नीची हत्या करत पती फरार..


भुसावळ - भुसावळ शहरामधून एक धक्क्कादायक प्रकार सामोरे आला आहे. रेल्‍वेत कर्मचारी असलेल्‍या इसमाने एकाचवेळी आई व पत्‍नीचा खून केल्‍याची घटना घडली आहे. दुहेरी खुनाच्‍या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.

भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथे रेल्‍वे कर्मचारी हेमंत कुमार भूषण परिवारासह वास्तव्यास होते. हेमंत याचा काही महिन्‍यांपुर्वीच विवाह झाला होता.आई आणि पत्नीमध्ये कुठल्याही कारणाने नेहमी कुरबूर होत असे. नेहमीच कौटुंबिक वाद होत असल्‍याने या वादातून त्याने आई सुशीलादेवी (वय ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण (वय २४) यांना तव्याने मारहाण करत हत्‍या केली.

या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, मंगेश गोंटला, हरिष भोये पोहचले असून चौकशी करत आहेत.

No comments:

Post a Comment