लग्न समारंभात चोऱ्या करणारे जेरबंद, आतंरराज्य टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 22, 2023

लग्न समारंभात चोऱ्या करणारे जेरबंद, आतंरराज्य टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश.

 लग्न समारंभात चोऱ्या करणारे जेरबंद, आतंरराज्य टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश.


अहमदनगर - 
लग्न समारंभातून रोख रक्कम व‎ मोबाईलची चोरी करणारी आंतरराज्य‎ टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश‎ आले. या टोळीकडून एक लाख ४४‎ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत‎ करण्यात आला. प्रदीप कालुसिंग‎ दपानी (वय २४, रा. कडीयासासी,‎ जि. राजगड, मध्य प्रदेश), अमित‎ पन्नासिंग सासी (वय १९, रा.‎ लक्ष्मीपुरा जि. बारहा, राजस्थान)‎ अशी चोरट्यांची नावे आहेत.‎

यमुना रघुनाथ लांडगे (वय ७५ रा.‎ लांडगेमळा, ता. नगर) या १२ मे रोजी‎ मनमाड रोडवरील बंधन लॉन येथे‎ लग्न समारंभात असताना चोरट्याने‎ दोन लाख १० हजार रूपये किंमतीचा‎ ऐवज असलेली पर्स चोरली होती. ही‎ घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे‎ शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली अंमलदार मनोज‎ गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप‎ पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले,‎ संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजीत‎ जाधव, आकाश काळे, अमृत‎ आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत‎ राठोड, फुरकान शेख, संभाजी‎ कोतकर यांचे पथक समांतर तपास‎ करत होते. या गुन्ह्यातील चोरटे हे‎ मध्यप्रदेश पासींगच्या दुचाकीवरून‎ पुणे येथून नगर जिल्ह्याकडे येत‎ आहेत, अशी माहिती निरीक्षक आहेर‎ यांना मिळाली होती.

निरीक्षक आहेर‎ यांनी पथकास कारवाई करण्याचे‎ आदेश दिले. पथकाने सुपा टोल नाका‎ परिसरात सापळा लाऊन दोघांना‎ पकडले. त्यांच्याकडे ८० हजार रूपये‎ रोख रक्कम व दोन मोबाईल फोन‎ मिळून आले. सदरची रक्कम ही नगर‎ शहरातील बंधन लॉन्स येथील लग्न‎ समारंभामध्ये चोरी केल्याचे त्यांनी‎ सांगितले. त्यांनी एक लाख रूपये‎ वसंत कुमार (पुर्ण नाव माहित नाही,‎ रा. मध्यप्रदेश) व कालुसिंह (पुर्ण नाव‎ माहित नाही, रा. लक्ष्मीपुरा,‎ राजस्थान) यांच्या बँक खात्यामध्ये‎ पाठविल्याचे सांगितले. तसेच‎ गुन्ह्यातील चोरी केलेले मोबाईल‎ फेकून दिल्याची कबूली त्यांनी दिली.‎ सदर गुन्हा करताना साथीदार‎ भुपेद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया याच्या‎ सोबत केल्याची कबुलीही दिली.‎

No comments:

Post a Comment