कर्जत मध्ये महादेव जानकार यांना घातला ५५ हजार रुपयांच्या नोटाचा हार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 22, 2023

कर्जत मध्ये महादेव जानकार यांना घातला ५५ हजार रुपयांच्या नोटाचा हार.

 कर्जत मध्ये महादेव जानकार यांना घातला ५५ हजार रुपयांच्या नोटाचा हार.


कर्जत -
राष्ट्रीय समाज पक्षाला तुम्ही ताकद द्या मी रवींद्र कोठारी यांना आमदार मंत्री करतो असे आवाहन रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कर्जत येथे काढले. लोकवर्गणीतून निधी संकलन कार्यक्रमात कर्जत तालुक्यातून पंचावन्न हजार रुपयाचा हार जानकर यांना घालण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. 
रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या ५५ व्या वाढदिवसा निमित्त कर्जत रासप च्या वतीने ५५ हजार रुपयाच्या नोटांचा हार पक्ष निधी म्हणून जानकर यांना घालण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासपचे राज्याचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी करताना पक्षाच्या कामाची माहिती दिली तर   
राष्ट्रीयअध्यक्ष महादेव जानकर यांनी बोलताना रासप ची ताकद वाढते आहे. चार राज्यात पक्षाची नोंदणी झाली आहे. तुम्ही सर्व जण कोठारी यांच्या मागे उभे रहा, मी त्यांना आमदार करतो थेट मंत्री ही करतो असे म्हणत त्याच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास रासपचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते महा सचिव माऊली सलगर, युवकचे प्रदेश अध्यक्ष अजित पाटील, आदी प्रमुख पाहुन्याच्या उपस्थितीत 
राज्याचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी,  रमेश व्हरकटे, यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तालु्काध्यक्ष  रामाअण्णा तोरडमल, भानुदास हाके मेजर, बापुराव व्हरकटे, महेंद्र कोपनर, परशुराम व्हरकटे, संजय खरात, ॲड. रणजीत कारंडे, शिवाजी तोरडमल आदी सह अनेक जण उपस्थित होते. यावेळी प्रवीण कोठारी, संतोष कोठारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रमेश व्हरकटे यांनी सूत्रसंचलन करत आभार मानले.

No comments:

Post a Comment