चोरीची माहिती पोलिसांना दिल्याचा राग, ८ जणांचा महिलेवर अत्याचार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 22, 2023

चोरीची माहिती पोलिसांना दिल्याचा राग, ८ जणांचा महिलेवर अत्याचार..

 चोरीची माहिती पोलिसांना दिल्याचा राग, ८ जणांचा महिलेवर अत्याचार..


छत्रपती संभाजीनगर : 
मुंबईहून चोरी करून आलेल्यांची माहिती पोलिसांना का देते असा जाब विचारत आठ जणांनी एका चाळीस वर्षीय महिलेला मारहाण करून एकाने तिच्यावर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसी भागामध्ये उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोल्जर संदीप पवार, शिवा गवळी, पोपट नारायण पवार, धनेश नारायण पवार, तेजस अक्षय काळे, अश्विनी पोपट पवार, गंधका सुदर्शन पवार, जिजाबाई धनेश पवार असे आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरामध्ये असलेल्या लक्ष्मी गायरान परिसरामध्ये एक चाळीस वर्षे पीडित महिला राहते पीडित महिला रहात असलेल्या ठिकाणी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी हे पीडित महिलेच्या घरी आले. यावेळी आरोपींनी पिडीतेला घरात घुसताच मारहाण करायला सुरुवात केली.
यातील पोपट पवार यांनी पीडित महिलेला तू मुंबईहून चोरी करून आलेल्या चोरट्यांची माहिती पोलिसांना का देते, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना पीडित महिलेने, 'मी कुणालाही माहिती दिली नाही', असं सांगतात सर्व आठ आरोपींनी मिळून महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. यावेळी, 'तुझ्या मेव्हण्याप्रमाणे तुला कापून टाकू', अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता सोल्जर पवार यांनी पीडित चाळीस वर्षे महिलेवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
यातील सर्व आरोपी पीडितेच्या घरून निघून गेल्यानंतर पीडित महिलेने वाळूज पोलीस ठाणे गाठत घडलेली सर्व आपबीती पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर कथन केली. दरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांनी तात्काळ आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment