उद्या आगडगावात दीड हजार किलो आंब्याच्या रसाचा महाप्रसाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

उद्या आगडगावात दीड हजार किलो आंब्याच्या रसाचा महाप्रसाद.

 उद्या आगडगावात दीड हजार किलो आंब्याच्या रसाचा महाप्रसाद.


अहमदनगर ः
आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ रविवारी (ता. 28) दीड हजार किलो आंब्याच्या रसाचा महाप्रसाद दिला जाणार आहे. सुमारे आठ ते दहा हजार भाविक त्याचा लाभ घेणार आहेत.
नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आगडगाव आहे. तेथे काळभैरवनाथांचे मंदिर आहे. प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी व आमटी हा महाप्रसाद गेल्या सुमारे 20 वर्षांपासून दिला जात आहे. तेथे राज्यातूनच नव्हे, तर परदेशांतून भाविक दर्शनासाठी येत आहेत. शिर्डी, शिंगणापूरला आलेले अनेक भाविक काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी येतात. नगर शहरवासीयांना हे जवळचे पर्यटनस्थळ झाले आहे.
रविवारी होणार्‍या महाप्रसादाचा लाभ सुमारे आठ ते दहा हजार लोक घेतात. बाजरीची भाकरी, आमटी, गोड पदार्थ, भात असे त्याचे स्वरूप असते. उन्हाळ्याच्या अखेरीस दरवर्षी आमरसाची मेजवानी भाविकांना दिली जाते. त्यानुसार या वर्षी नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी दीड हजार किलो आंबे वापरण्यात येतील. सोबत चपात्या असतील. तसेच आमटी, भात, ठेचा व इतर पदार्थ असतील. आंब्याचा रस काढण्यासाठी खास मशिनची व्यवस्था करण्यात येते. तसेच सुमारे 50 महिला चपात्या, भाकरी बनविण्याचे काम करतात. दरम्यान, आंब्यांच्या सीझनमध्ये तो खाणे आरोग्यदायी असते. देवस्थानाजवळ दर वर्षी आमरसाचा महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी भाविक विशेष दान देतात. राज्यभरातून आलेले भाविक महाप्रसाद घेतात, असे भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment