आपसातील वादामुळे; सोळा वर्षीय मुलाचा निर्घृण खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

आपसातील वादामुळे; सोळा वर्षीय मुलाचा निर्घृण खून.

 आपसातील वादामुळे; सोळा वर्षीय मुलाचा निर्घृण खून.


अकोला‎ - 
१६ वर्षीय मुलाचा धारदार‎ शस्त्राने गळा कापून त्याची‎ निर्घृण हत्या करण्यात आली.‎ त्यानंतर हल्लेखोर पळून गेला.‎ हल्लेखोर हा अल्पवयीन‎ असल्याचा संशय पोलिसांना‎ आहे. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या‎ सुमारास सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीतील कमला नेहरू नगर परिसरात घडली.‎ रोहन रणजीत सोळंके असे मृत युवकाचे नाव‎ आहे. गुरुवारी याच परिसरात लग्न असल्याने‎ त्याचे मित्र लग्नात होते.

रात्री रोहन परिसरातील‎ नदीच्या काठावर असलेल्या गाडीवर मोबाइल‎ पाहत बसला होता. पूर्ववैमनस्यातून पाठीमागून‎ हल्लेखोर आले आणि त्याच्या मानेवर शस्त्राने‎ वार केला. त्यानंतर समोरून त्याच्या पोटावर वार‎ केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. त्यानंतर हल्लेखोर नदीच्या पुलालगत पळून गेले. ‎ शहरात दंगलीची घटना ताजीच असल्याने संपूर्ण ‎शहरात आधीच अर्लटमोडवर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिटी‎ कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रशेखर‎ कडू ताफ्यासह पोहोचले होते. तसेच स्थानिक‎ गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले,‎ फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉगस्कॉडनेही आरोपीचा‎ शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी‎ सापडला नाही. हल्लेखोर हा अल्पवयीन‎ असल्याने त्याच परिसरातील रहिवासी‎ असल्याचा संशय पोलिसांना आहे. रात्री उशिरा‎ पोलिसांनी परिसरातील काही युवकांना ताब्यात‎ घेतले होते. त्यांची विचारपूस करून त्यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली व‎ त्यांना सोडून दिले होते. सिटी कोतवाली पोलिस व स्थानिक गुन्हे‎ शाखेचे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. घटनास्थळावर पोलिस‎ अधीक्षक संदीप घुगे यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना‎ दिल्या.‎

No comments:

Post a Comment