शहरात अस्वच्छता, खड्डेयुक्त रस्ते याची मोठी समस्या असताना; मनपाला पाच कोटी रुपयाचे बक्षीस कोणत्या कारणाने दिले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

शहरात अस्वच्छता, खड्डेयुक्त रस्ते याची मोठी समस्या असताना; मनपाला पाच कोटी रुपयाचे बक्षीस कोणत्या कारणाने दिले..

 मनपाला पाच कोटी रुपयाचे बक्षीस कोणत्या कारणाने दिले; जागरूक नागरीक फोरमचे मंत्रालयाला निवेदन.



अहमदनगर :
शहरातील अस्वच्छता, खड्डेयुक्त रस्ते याची मोठी समस्या आहे मात्र तरीही अहमदनगर शहराला मागच्या महिन्यामध्ये पाच कोटी रुपयाचा पुरस्कार दिला गेला आहे. तो पुरस्कार कोणी? कसा ? कशाच्या आधारावर ? आणि शहरातल्या कुठल्या भागाचे निरीक्षण केल्यावर दिला गेला ? हा प्रश्न आहे,  प्रत्यक्षात अहमदनगर मधील रस्त्याची स्वच्छतेची व गटारीची बिकट अवस्था आहे  असे असतानाही जर स्वच्छतेबाबत या मनपाला पाच कोटी रुपयाचे बक्षीस कोणत्या कारणाने दिले जात आहे.  नगर शहरातील समस्यांचे वास्तव चित्राचे सर्व्हे करण्यासाठी  मंत्रालयातील प्रामाणिक अधिकारी अहमदनगर मध्ये तीन चार दिवस मुक्कामी सरप्राइज व्हिजीटला पाठवून द्यावे. अशी मागणी जागरूक नागरीक फोरम मंचच्या वतीने अध्यक्ष सुहासभाई मुळे  यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनातून केली आहे तसेच या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रालय मुख्य सचिव तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना पाठविल्या आहेत. 

तसेच महापौरांनी देखील महानगर पालिकेतील कामचुकार अधिकार्‍यांची किती वाईट अवस्था आहे याची कल्पना दिली आहे, हे अधिकारी खरंच कधी त्याच्या पगाराइतके तरी फिरून वार्ड निहाय कधी आढावा घेतात की नाही? याचे कड़क पोस्ट मार्टम होणे गरजेचे आहे  आणि मनपाला तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आदेश द्यावेत म्हणजे मग आपण मंत्रालयातून पाठवलेला रस्ते, पाणी, गटारी, निधी.. दिलेले स्वच्छतेचे खोटे पुरस्कार आणि प्रत्यक्षातली वाईट परिस्थिती याची कदाचित आपल्याला थोडीफार कल्पना येईल, आणि आमच्या नगर शहराचे आपत्ती व्यवस्थापनच कसे आपत्तीग्रस्त आहे याची कल्पना येईल. तरी याचा गांभीर्याने विचार करावा. असेही निवेदनात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment