नगरकरांना लवकरच अमृतचे शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल : उपमहापौर गणेश भोसले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

नगरकरांना लवकरच अमृतचे शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल : उपमहापौर गणेश भोसले.

 नगरकरांना लवकरच अमृतचे शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल : उपमहापौर गणेश भोसले.


नगर -
शहराला पाणीपुरवठा करणारी अमृत पाणी योजनेचे पाणी वसंत टेकडी येथील पन्नास लाख लिटर टाकीमध्ये पडले आहे. योजनेचे काम मुळा धरण ते वसंत टेकडी पर्यंत सुरू असताना पाईपमध्ये माती गेली होती.  आता ते पाणी टाकीत पडले आहे गढूळ पाणी येत असून टाकी वाशिंगचे काम सुरू आहे. वसंत टेकडी येथील अमृत पाणी योजनेचे वाशिंगचे पाणी लोखंडी पूल सीना नदी येथे काढण्यात आले आहे. लवकरच अमृत पाणी योजनेच्या सर्व चाचण्या पूर्ण होतील व नगरकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.  

अमृत पाणी योजनेच्या वाशिंग कामाची पाणी लोखंडी पूल सीना नदी येथे उपमहापौर गणेश भोसले यांनी केली. यावेळी पाणीपुरवठा विभागातील इंजिनिअर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment