नगर पाथर्डी महामार्गावरील घटना; दुचाकी-टेम्पोच्या धडकेत एक ठार, एक जखमी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

नगर पाथर्डी महामार्गावरील घटना; दुचाकी-टेम्पोच्या धडकेत एक ठार, एक जखमी..

 नगर पाथर्डी महामार्गावरील घटना; दुचाकी-टेम्पोच्या धडकेत एक ठार, एक जखमी..


अहमदनगर -
पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ मार्गातील खड्डा चुकवताना मोटरसायकल व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातामध्ये मोटरसायकल वरील एक जण ठार व एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
योगेश कुंड (रा. टाकळीभान, ता. पाथर्डी) असे या अपघाता मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांच्यासोबतची एक महिला गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समजली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर – पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण विषाखापटनम या राष्ट्रीय महामार्गाचे काम जांबकौडगाव पासून पुढे मराठवाडी, करंजी, देवराई, तिसगाव, निवडुंगे पर्यंत सुरू आहे.

देवराई गावाजवळ केलेले काम निकृष्ट झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. देवराई गावाजवळ बायपास रस्ता झालेला आहे त्यापुढे पूर्वीच्या ठेकेदाराने एक पूल व रस्ता केलेला आहे हा पूल देखील खचला असून रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत नवीन ठेकेदार पूर्वीचा रस्ता दुरुस्त करण्यास तयार नसल्याने या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे.

No comments:

Post a Comment