अहमदनगर :-पारनेर फाटा ते पारनेर जाणाऱ्या रोडवर दि.26 मे रोजी सकाळी 7.30 च्या दरम्यान अंकुश भिमाजी कोठावळे रा.सांगवी सूर्या तालुका पारनेर यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खुणाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी व स्थानिक गुन्हे शाखा यांना तपास करणे बाबत सूचना केल्याने या गुन्ह्याच्या तपासाकांनी पथके रवाना करण्यात आली होती परंतु कोणताही तांत्रिक पुरावा नसल्याने तपासात अडचणी येत होते त्याचवेळी गुप्त बातमीदारामार्फत खून करून पसार झालेल्या आरोपीचे वर्णन मिळाले. त्या इसमाच्या वर्णनावरून व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आसपासचे गावामध्ये शोध घेऊन तपास पथकाने भाऊसाहेब विठ्ठल वाघोली राहणार पिंपळनेर तालुका पारनेर यास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.सदरची कामगिरी राकेश ओला पोलीस अधिक्षक, प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण (चार्ज), दिनेश आहेर,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक सुपा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली धाकराव,काळे,खंडेराव शिंदे,मखरे,रमेश शिंदे,वेठेकर,यश ठोंबरे,संदीप पवार,कल्याण लगड,भिमराज खर्से,कुसाळकर यांनी केलेली आहे.
सुपा-खुनातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलिसांकडून गजाआड.
No comments:
Post a Comment