बाजार समितीत विखेंची छुपी मदत मिळाली ? आ.रोहित पवार म्हणाले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 19, 2023

बाजार समितीत विखेंची छुपी मदत मिळाली ? आ.रोहित पवार म्हणाले..

 बाजार समितीत विखेंची छुपी मदत मिळाली ? आ.रोहित पवार म्हणाले..

तो त्यांच्या पार्टीचा अंतर्गत विषय.


अहमदनगर -
जामखेडमध्ये ईश्वर चिठ्ठी काढून सभापतीपदाची माळ भाजपचे शरद कार्ले यांच्या गळ्यात पडली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली. यानंतर भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसह विखे शिंदे आरोप प्रत्यारोपावरही भाष्य केलं. जामखेड बाजार समितीची होती चिठ्ठी निघाल्यानंतर तिथे जो सभापती आहे तो भाजपचा झाला, जे तिथे असणारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विखेंबाबत जे वक्तव्य केलं तो त्यांच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे.
जामखेड बाजार समितीत जर आम्ही अर्थकारण, पैशाचा वापर केला असता तर तिथे आमचा सभापती होऊ शकला असता. पण शेवटी लोकं जो निर्णय देतात. तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि पुढे जावं लागतं. त्यामुळे विखे आणि शिंदे काय बोलतात. आतल्या आत काय करतात, तो त्यांचा त्यांचा विषय आहे. पण विखेंचं वलय त्या जिल्ह्यामध्ये नक्की आहे हे एक नक्की आहे. अशा परिस्थितीत मला त्यांची कुठेही मदत झालेली नाही आणि मदत झाली नसेल तर मग रडीचा डाव भाजपच्या तिथल्या स्थानिक नेत्याकडून का केला जातोय याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment