दाते सरांच्या रूपाने कर्तृत्ववान सभापती मिळाला : मा. आ. दादाभाऊ कळमकर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 23, 2023

दाते सरांच्या रूपाने कर्तृत्ववान सभापती मिळाला : मा. आ. दादाभाऊ कळमकर.

 दाते सरांच्या रूपाने कर्तृत्ववान सभापती मिळाला : मा. आ. दादाभाऊ कळमकर.


पारनेर -
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रांधे फाटा ते पाबळ रस्ता (ग्रामा-१७४) नवीन पुलासह मजबुतीकरण करणे - १५ लक्ष कामाचे लोकार्पण माजी आमदार दादाभाऊ कळमकर व ह.भ.प. सरकटे महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर होते. तर ह भ प तुळशीराम महाराज सरकटे, अळकुटी सरपंच डॉ. कोमल भंडारी, उपसरपंच आरिफ पटेल, माजी सरपंच शरद घोलप, निवृत्त मुख्याध्यापक आर. एस. कापसे सर, पाबळ माजी सरपंच राजेंद्र कवडे प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी बोलताना माजी आ. दादा कळमकर म्हणाले मी दाते सरांना म्हस्नेफाटा, पळवे बुद्रुक  पाच, सहा गावांना जोडणा-या रस्त्याला खूप खड्डे पडलेले असून तेवढे दुरुस्त करा असे सांगितले होते. परंतु सरांनी त्या रस्त्याला ५४ लक्ष रुपये निधी टाकून मला फोन केला, असा कर्तृत्ववान सभापती पारनेर तालुक्याचा जिल्हा परिषदेला मिळाला. दाते सरांनी त्यांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात खूप मोठे विकासाचे काम केले. आम्ही राजकीय विरोधक असलो तरी चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. अळकुटी चा परिसर सर तुमच्या विकास कामांवर प्रेम करतो, सत्ता मिळाल्यानंतर विकास कामे केली पाहिजे. दाते सर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असल्यापासून माझा संपर्क आहे मी तालुक्याचा नेहमी आढावा घेतो, सर तुमचा संघर्षाचा गट परंतु तुम्ही पुन्हा निवडून येऊन हा रस्ता डांबरीकरण करून देतान अशी खात्री आहे. दिलेला शब्द कधी टाळत नाहीत, दाते सर एक चांगले नेते, चांगले काम करणारे आहेत. आपण त्याच स्वागत केलं पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले आज या कामाचे लोकार्पण करताना दुग्धशर्करा  योगायोग आला आहे. आपले श्रद्धास्थान असलेले हभप सरकटे महाराज आणि माजी आमदार दादा कळमकर साहेब यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ३५ ते ४० वर्षापासून या रस्त्याची मागणी होती ती आज पूर्ण करण्याचा योग आला. यावेळी कामाचे ठेकेदार फारुख शेख उपस्थित होते. प्रस्तावना विश्वनाथ कवडे यांनी केली सुत्रसंचलन शिवराज कदम केले तर आभार पांडुरंग कवडे यांनी मानले.

दाते सरांच्या बाबतीत कायमच आधाराची भावना होते. स्वतः करिता सर्वच जीवन जगतात परंतु माझ्या बरोबर चार लोकही जागावेत हा विचारच परमार्थ आहे. या रस्त्याची नितांत गरज होती ती पूर्ण झाली. दाते सरांचा परिसराला आधार आहे. एवढी कामे जिल्हा परिषद मध्ये करता येतात हे त्यांनी दाखवून दिले. या अगोदर अनेक सभापती झाले परंतु त्यांनी वेगळं पण दाखवलं :  ह. भ. प. तुळशीराम महाराज सरकटे.

No comments:

Post a Comment