दिव्यांग कर्मचार्‍यांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

दिव्यांग कर्मचार्‍यांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

 प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची शिक्षणाधिकारीकडे मागणी.

दिव्यांग कर्मचार्‍यांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा.


अहमदनगर -
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग कर्मचार्‍यावर होणार्‍या त्रासा संदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. तर ऑनलाइन प्रमाणपत्र, युडी आयडी प्रमाणपत्र असलेल्या व ज्या कर्मचार्‍यांची वारंवार पडताळणी झाली आहे. अशा कर्मचार्‍यांना कोणत्याही संघटनांच्या सांगण्यावरून नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
दिव्यांग कर्मचारीसाठी नेहमीच असलेला सकारात्मक प्रतिसादाबद्दल शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हा सचिव हमिद शेख, जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे, राहुरी तालुका समन्वयक ह.भ.प. नानासाहेब शिंदे, शहराध्यक्ष संदेश रपारिया आदी उपस्थित होते.
काही व्यक्तींच्या चूकीमुळे सर्वच दिव्यांगांना त्रासाला सामोरे जावे लागत असून, दिव्यांग कर्मचार्‍यांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती सेना व प्रहार दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांनी कोणत्याही कर्मचार्‍यावर कोणालाही शंका असेल तर त्यांचे नाव व पुरावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च त्या संस्थेनी करावा. ती व्यक्ती बोगस नसेल तर तक्रारदारावर अवमान याचिका दाखल करण्यासाठीही संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment