पारनेर मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 22, 2023

पारनेर मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन....

पारनेर मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन....
पारनेर -  १२ व्या शतकात जन्मलेल्या महत्मा बसवेश्र्वरांनी समता, बंधुता व न्याय या भूमिकेचे समर्थन करत देशात मानवतावादी युग निर्माण केले. श्रमाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली. श्रमाला कैलासाचे कायकवे कैलास रूप दिले. कैलास पद्धत लागू करून नव अध्याय रचला म्हणुन बसवेश्र्वरांना युगप्रवर्तक, क्रांतिसूर्य, विश्र्वगुरु, महत्मा आदी नावाने आदराने संबोधले जाते. पारनेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बसवेश्वर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः महात्मा बसवेश्वर यांची सर्व लिंगायत बांधवांकडून सामुदायिक धार्मिक पद्धतीने आरती घेण्यात आली.या वेळी पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते महत्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठानचे दिपक लंके,  राष्ट्रवादी काँगेस तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, शिवसेना नेते काशिनाथ दाते सर, नगर पंचायत मुख्याधिकारी सौ सुनिता कुमावत, मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संतोष सोबले, पत्रकार भगवान गायकवाड,राष्ट्रवादी काँगेस जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगरसेवक भुषण शेलार, नगरसेवक युवराज पठारे शिक्षक नेते रा या औटी, जेष्ठ नेते बाळासाहेब पठारे, बाळासाहेब मते,बाळासाहेब नगरे, बबन चौरे, ॲड गणेश कावरे, देवराम ठूबे, ऋषिकेश गंधाडे, शकील शेख, राजु शेख, सचिन नगरे, वसीम राजे,बाळासाहेब पठारे,बलभीम कुबडे, किरण कुबडे, मयुर जेऊरकर, शिवलिंग वाळेकर, बाळु वाळेकर, संदीप वाळेकर, गुळवे सर, बाबा जेऊरकर, स्वरूप जेऊरकर, शिवलिंग जेऊरकर, प्रकाश बागले, विजय सगणे , अजय सगणे, राजीव भोसले, सचिन कुबडे, सुधीर जेऊरकर, जय लिंगायत, प्रथमेश वाळेकर, राहुल जेऊरकर, ओम वाळेकर, सर्वेश वाळेकर, सार्थक झळके, गणेश घोंगडे, राजु घोंगडे, तुषार कुबडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण कुबडे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष मयुर जेऊरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment