अवैध कट्टा बाळगणाऱ्याच्या पारनेर पोलिसांनी आवळ्ल्या मुसक्या.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 22, 2023

अवैध कट्टा बाळगणाऱ्याच्या पारनेर पोलिसांनी आवळ्ल्या मुसक्या....

अवैध कट्टा बाळगणाऱ्याच्या पारनेर पोलिसांनी आवळ्ल्या मुसक्या....
पारनेर - पारनेर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, रा.राळेगण थेरपाळ ता.पारनेर येथील प्रमोद बंटी गव्हाणे याच्या कडे एक गावठी बनावटीचे पिस्टल असून त्याच्या आधारे तो गावात दहशत करून मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहे या माहिती वरुन लगेच वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथक तयार करुन राळेगण थेरपाळ येथे छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. आणि पंचा समक्ष अगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्टल त्याच्या कडे मिळून आला.त्याच्याकडे त्या बाबत चौकशी केली असता मित्रा कडून आणल्याचे सांगितलें.मित्राचा तपास केला असता तो मिळून आला नाही.या बाबत पो कॉ.मयुर तोरडमल यांनी पारनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे
सविस्तर माहिती अशी पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, प्रमोद बंटी गव्हाणे रा राळेगण थेरपाळ ता. पारनेर हा त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून तो त्याच्या आधारे त्याच्या गावात दहशत निर्माण करून मोठा गुन्हा करण्याचा तयारीत आहे. त्या बाबत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले यांना पोलीस पथक तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्याच्या वर छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. त्या नुसार त्यांनी पोलीस पथक तयार करुन राळेगण थेरपाळ गावात जाऊन प्रमोद बंटी गव्हाणे याच्यावर सापळा लाऊन पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळून जात असताना त्यास शिताफीने पाठलाग करुन  घरासमोर त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ असलेली गावठी बनावटीचे पिस्टल पांढरा धातूचे तिचे पिस्टल ग्रिपवर काळ्या रंगाची प्लास्टिक मूठ स्क्रूने बसवलेली मेगझिन सह मिळून आली. त्या बाबत प्रमोद बंटी गव्हाणे यास विचारले असता सदर कट्टा हा त्याचे एका मित्रा कडून आणल्याचे सांगितलें असून त्याचे मित्राचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. आरोपी विरुद्ध पो को. मयुर तोरडमल यांनी पारनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्या नंतर गुन्हा दाखल केला आहे.
वरील करवाई हि पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अनिल कातकाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर शहर विभाग अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पो. हे कॉ. गणेश डहाळे, जालिंदर लोंढे, पो ना गहिनीनाथ यादव, पो कॉ. मधूकर तोरडमल, सारंग वाघ, सत्यजित शिंदे, सागर धुमाळ, सूरज कदम या पथकाने कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment