पारनेरच्या तहसिलदारांकडून शेतकऱ्याच्या मालाची अवहेलना.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 24, 2023

पारनेरच्या तहसिलदारांकडून शेतकऱ्याच्या मालाची अवहेलना..

पारनेरच्या तहसिलदारांकडून शेतकऱ्याच्या मालाची अवहेलना..

पारनेर - पारनेर तालुक्यातील शिवपाणंद शेत्तस्त्यासह पुरातन जलस्रोताच्या प्रश्ना बाबत समस्त शेतरस्ते पिडीत शेतकरी यांनी आज दि.२४ रोजी पारनेर तहसील कार्यालय येथे पेरू वाटप आंदोलनं पुकारले होते. परंतु जनतेचे लोकसेवक असलेले पारनेरचे. तहसिलदार शिवकुमार आवळकुंठे यांनी आंदोलकांना धमकावत तहसील कर्मचारी यांच्या मार्फत शेतकऱ्याच्या पेरूची मालाची घोर अवहेलना करत शेतकऱ्यांचे आंदोलनं चिरडण्याचा संताप जनक प्रकार केला आहे. सध्या १४४ कलम लागू आहे सर्वांना वर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. शेतकरी विरोधी तहसिलदार यांच्यावर करवाई करण्यासाठीं जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देणार असल्याचे शेतकरी आंदोलन कर्त्यानी प्रसार माध्यमांना सांगितलें आहे. या पुढील शेतकऱ्याचे आंदोलनं अधिक तीव्र करण्यात येइल असेही आंदोलक सांगत आहेत.

No comments:

Post a Comment