विरोधकांना दोन आकड्याच्या पुढं जाऊ देणार नाही : खा. सुजय विखे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 15, 2023

विरोधकांना दोन आकड्याच्या पुढं जाऊ देणार नाही : खा. सुजय विखे.

विरोधकांना दोन आकड्याच्या पुढं जाऊ देणार नाही : खा. सुजय विखे.

कर्डिले समर्थकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात खा. विखेंचे सुतोवाच.


नगरी दवंडी 
अहमदनगर : विखे घराणे हे सुसंस्कृत घराणे आहे. बिनबुडाचे आरोप कोणावर करत नाही. परंतु, विखे घराण्यावर ज्यांची बोलण्याची पात्रता नाही ते उठसूट आरोप करीत आहेत. सत्ता असतांना काहीही करु न शकलेले ते आता विकासाच्या गोष्टी बोलू लागले आहेत.
सुजय विखे गप्प राहून समोरच्या पॅनलला दोन आकडयाच्या पुढं जाऊ देणार नसल्याचे सूतोवाच खा. सुजय विखे यांनी केले. 
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके नगर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे नेते शिवाजी कर्डीले माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बबनराव पाचपुते होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, युवा नेते अक्षय कर्डीले, माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, विलास शिंदे, दादाभाऊ चितळकर, रमेश भांबरे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले, संभाजी लोंढे, अरुण होळकर, दत्ता नारळे, अशोक झरेकर, मनोज कोकाटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले,
तालुक्याच्या विकासासाठी काय करणार हे काल कुणीच बोललं नाही. मुलांच्या, महिला -मुलींच्या सुरक्षितते साठी कुणीच काही बोलत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण पाहिजे. 
वाळू तस्करी, हप्तेखारी, अवैध धंदे बंद झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. विरोधकांकडे कोणतेही विकासाचे व्हिजन नाही, वैचारिक दूरदृष्टी नाही. 
  नगर बाजार समितीकडे जाण्यासाठी पुणे महामार्गापासून अडीच कोटी रुपयांचा रस्ता मंजूर केला आहे. आघाडी सरकारच्या काळात कांद्यासाठी एक रुपयाचे अनुदान देवू शकले नाही. या सरकारते ३५० रुपये अनुदान दिले. त्यासाठीची उतार्‍यावरील ऑनलाईन पिक नोंदीची अट शिथील करण्यात येणार आहे.  कांदा आणण्यासाठी किसान रेल्वेसाठी प्रयत्न करणार आहेे. 
शुक्रवारी नगरमध्ये व्यापार्‍यांवर हल्ला झाला.  सरकारी यंत्रनेला गंज लागला असून तो गंज पुसवून गुन्हेगारीला आळा घालण्याची वेळ आली असल्याचे सुतोवाच करून येत्या १० दिवसांत जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पाऊले उचलणार असल्याचे ते म्हणाले. 
भाजप नेते शिवाजी कर्डिले म्हणाले, गेल्या १५ वर्षापासून बाजार समिती सत्ता ताब्यात आहे. सत्ता आल्यापासून बाजार समितीचा राज्यात नौवलौकिक झाला. भव्य नेप्ती उपबाजार समिती उभी राहिली.  यात माजी सभापती भानुदास कोतकर यांचे मोठे योगदान आहे. याची दखल राज्याच्या नेते मंडळींनी घेत कौतुकही केले आहे. शेतकर्‍यांच्या मालाला न्याय मिळवून दिला. गाळे दिले. बाजार समितीच्या माध्यमातून कोरोना सेंटर उभारले. अनेकांचे जीव वाचविले.
 छावण्या काढून शेतकर्‍यांची जनावरे वाचविली. गायीची धार मागून काढतात की पुढून हे ज्यांना माहित नाही त्यांनी चारा छावण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांचा चष्मा बदलण्याची वेळ आली असून 
विरोधक काय उद्योग करतात हे सर्व तालुक्याला माहित आहे. जिल्हा परिषदेत टक्केवारीसाठी सकाळी आठ वाजताच जावून बसता. जनतेचे पैसे खाण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे.
ज्यांना आमदार होता आले नाही, तीन तीन वेळा पराभव झाला, ते दुसर्‍यांना आमदार करायला निघाले आहेत. जिल्हाप्रमुख पद हे हॉटेलमध्ये येणाऱ्या नेते मंडळींची सोय करण्यासाठीच ठेवले. हॉटेल कुणाला देऊ नका तुमचीच गैरसोय होईल तेव्हा ते तुम्हालाच राहू द्या असा टोला प्रा. गाडे यांना लगावला. दूध संघाचा निर्णय सात तालुक्यातील मंडळींनी घेतला आहे. त्यात माझा संबंध नसल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
तत्कालीन मंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन बाजार समितीवर प्रशासक बसविला. आजोबांच्या नावाने असलेला कारखान्याला कुलूप लावले आहे आणि ते दुसर्‍या संस्था वाचवायला निघाले आहेत. कारखानदारांची असणारी जिल्हा बँक शेतकर्‍यांची केली आहे. शेतकर्‍यांच्या मुलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. जिल्ह्यात खासदारकी फक्त विखे घराण्याणेच करावी. चुकीचे वागणार्‍यांना या निवडणुकीत नीट करु असे म्हणून कर्डिले यांनी तनपुरे, लंके, गाडे यांच्या प्रचार सभेतील आरोपांचा सडेतोड  समाचार घेतला.
आमदार पाचपुते म्हणाले,  खासदार विखे, भाजप नेते कर्डिले व मी पाठपुरावा केल्यामुळे साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी मिळाली. रस्त्यांसाठी मोठा निधी आणला. नगर बाजार समितीत गेल्या पंधरा वर्षापासून चांगले काम सुरु असून पुन्हा बाजार समितीवर कर्डिले यांचीच सत्ता येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अक्षय कर्डिले, दिलीप भालसिंग, अनिल करांडे, रमेश भांबरे, अशोक कोकाटे, दत्ता नारळे, दादाभाऊ चितळकर, अभिलाष घिगे आदींची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment