अपहार करून पळवून नेलेला ट्रक जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 15, 2023

अपहार करून पळवून नेलेला ट्रक जप्त.

अपहार करून पळवून नेलेला ट्रक जप्त.
तोफखाना पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन 
केली धडक कारवाई.
अहमदनगर - अपहार करुन पळवून नेलेला मालट्रक मध्यप्रदेशमधुन जप्त करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. घटनेतील फिर्यादी गहिणीनाथ किसन दरेकर यांनी दि.३१/१२/२०२२ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर येथे फिर्याद दिली होती की, त्यांच्या ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचा इकोमेट मॉडेलचा मालट्रक क्रमांक एम.एच/१६ सी.सी. ३३४६ हा इसम नामे १) संजय शामसिंग परदेशी, रा. सिडको, नाशिक, २) समशेर शाहीद अली सय्यद,रा.नाशिक,३) अझहर हुसेन शेख, इंदिरानगर,नाशिक यांना मालट्रकवर असलेल्या १४,००,०००/- लाख रुपये कर्जची फेड करण्याच्या अटीवर विक्री केली असता आरोपींनी मालट्रकचे थकीत कर्ज न भरता फिर्यादी यांची फसवणुक केली वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन, गु.र.नं १२२६/२०२२ भा.दं.वि. क. ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासात यातील आरोपी रिजवान फिरोज खान, वय २८, रा. नाईकवाडीपुरा, सय्यद जुनेरी दर्गा, दरबार रोड,नाशिक यास निष्पन्न करुन त्याचा नाशिक येथे शोध घेवून त्यास दि.११/०४/२०२३ रोजी गुन्ह्यात अटक केली असता आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन रिमांड मुदतीत आरोपीकडे मालट्रक बाबत विचारपुस करता त्याने सदरची मालट्रकची भुपेंद्र सिंग, रा. मध्यप्रदेश यांना विक्री केल्याचे सांगीतल्याने, आरोपीसह तोफखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने मध्यप्रदेश येथुन गुन्ह्यातील फसवणुक केलेला १४,००,०००/रु किं.चा.अशोक लेलंड कंपनीचा इकोमेट मॉडेलचा मालट्रक क्रमांक. एम.एच/१६ सी. सी. ३३४६ तसेच २२,००,०००/- रुकि.चा. अशोक लेंलंड कंपनीचा इकोमेट मॉडेलचा मालट्रक क्रमांक एम.एच/१७ बी वाय/ २८५७ असा एकुण ३६,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही  राकेश ओला पोलीस अधीक्षक,  प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पो.नि. मधुकर साळवे यांच्या गुन्हे पथकातील सहायक पोलीस निरीक्षक, नितीन रणदिवे, पो.उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ  दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट,  सुरज वाबळे,  वसीम पठाण,  अविनाश वाकचौरे,  अहमद इनामदार संदिप धामणे, सतिष त्रिभुवन, सचिन जगताप, सतीष भवर, गौतम सातपुते,  शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment