राजकारणात दादागिरी गुंडगिरी जास्त दिवस चालत नाही ः निलेश लंके. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 14, 2023

राजकारणात दादागिरी गुंडगिरी जास्त दिवस चालत नाही ः निलेश लंके.

 राजकारणात दादागिरी गुंडगिरी जास्त दिवस चालत नाही ः निलेश लंके.

मार्केट कमिटीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एक होण्याची गरज.

त्यांच्या गैरकारभाराला कंटाळलेली जनता महा आघाडीला सत्ता देणार यात तीळ मात्र शन्का नाही. नगर बाजार समितीत शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्याची शाश्वती नाही. सत्ता आपल्या हातात देण्यासाठी आम्ही सुद्धा कम्बर कसली आहे. राजकारणात, शिक्षणात सरकार मुलींना आरक्षण देत. पण इथं चोवीस वर्षाच्या मुलीला मोक्का लावण्याच काम केलं जातय. स्वतः च राजकारण टिकविण्यासाठी कुठल्याही थराला ते जातात. आता त्यांचे आमदारकीला खिळ बसली असून शेवटचा ठोका मार्केट कमिटीला दयायचा आहे. - आमदार तनपुरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राजकारणात दादागिरी व गुंडगिरी जास्त दिवस चालत नाही. राजकारणात नम्रता असावी लागते स्व. दादा पाटील शेळके यांच्या स्वप्नातील मार्केट कमिटी निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एक होण्याची गरज असून आपली वजमूठ तुटणार नसून आता बदल घडविण्याचा आपण निर्धार करूया असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.
खासदार कै. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.राजकारणात समज गैरसमज होत असतात, काही दिवसापूर्वी इडिवाले आले पण यडे होऊन गेले. सत्तेचा गैरवापर होतोय. ज्यांना कोणी नडत नाही त्यांना निलेश लंके नडतो. माझं अख्ख आयुष्य संघर्षात गेलं असेही ते म्हणाले. प्रस्ताविकातून राजेंद्र भगत यांनी बाजार समितीतील विविध प्रश्न मांडले. रुईच्या कार्यक्रमात साकळाइच भूत आणलं असून दादा पाटलांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन रघुनाथ झिने यांनी केले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कपड्याने फाटके असले तरी मनाने फाटलेले नसून शेतकर्‍यांची कामधेनू वाचली पाहिजे असे आवाहन संदीप कर्डीले यांनी केले.
राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यावेळी म्हणाले की, महाविकास आघाडी ही काळाची गरज असून या निवडणुकीत विरोधकांनी केलेला गैरकारभार, दहशत, शेतकर्‍यांची लूट सर्वांच्या लक्षात आहे. इज्जती वाल्याना भीती घालण्याच काम त्यांनी केलं असून महाविकास आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे ही ते म्हणाले.
यावेळी ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे म्हणाले की, मार्केट कमिटीने शेतकर्‍यांना दुय्यम स्थान दिले व व्यापार्‍यांना प्रथम स्थान दिले. बाजार समितीचे गाळे 35:लाख रुपयांना विकले गेले. त्यांनी याविषयावर स्पष्टीकरण दयावे. ज्या दादा पाटलांनी सहकारी संस्था काढल्या त्या त्यांनी मोडीत काढले तसेच छावणी काळात मुक्या जितराबांचा चारा यांनी खाल्ला त्यातून शेण सुद्धा यांनी सोडले नाही. असं ही ते म्हणाले. कार्यक्रमास माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष घनशाम शेलार शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले मा. जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डीले, माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, जि. प. मा. उपाध्यक्ष प्रतापपाटील शेळके, मा. सभापती प्रवीण कोकाटे, रामदास भोर,मा. दिलीप पवार, रवींद्र भापकर,उपसभापती तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र भगत मा. पं सभापती संदीप गुंड, किसनराव लोटके, नगरसेवक योगीराज गाडे, अजय लामखेडे, उद्धव दुसुंगे, युवासेना सचिव विक्रम राठोड, मा. सभापती रावसाहेब शेळके, मा. जि. प. सदस्य शरद झोडगे, पृथ्वीराज नागवडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, संदीप कर्डीले, रामेश्वर निमसे, डॉ. राम कदम, भाऊसाहेब काळे, अभिषेक भगत, किरण काळे, आबा कोकाटे, मा. महापौर भगवान फुलसौन्दर,माधवराव लामखडे, संभाजी कदम, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक दत्ता जाधव, मा. महापौर अभिषेक कळमकर, यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष, तसेच तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment