अहमदनगर जिल्ह्यातील घटना.. डीजेच्या आवाजामुळे शिक्षकाचा मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 8, 2023

अहमदनगर जिल्ह्यातील घटना.. डीजेच्या आवाजामुळे शिक्षकाचा मृत्यू.

अहमदनगर जिल्ह्यातील घटना.. डीजेच्या आवाजामुळे शिक्षकाचा मृत्यू.
अहमदनगर: मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली तरी अलीकडे सण-उत्सवात पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरत असल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे जीव गमवावा लागला आहे. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याने शिक्षक अशोक बाबूराव खंडागळे (वय ५८) कोमात गेले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
खंडागळे श्रीगोंदा येथील नारायण आश्रमाचे केंद्रप्रमुख होते. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. हनुमान जयंतीच्या दिवशी ते कर्जत तालुक्यातील कौडाणे गावात गेले होते. तेथे मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्याचा त्यांना त्रास झाला. श्रीगोंदा येथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोमात गेले होते. काही काळ श्रीगोंदा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याला हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. आवाजाचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment