एमआयडीसी परिसरात ११ टपऱ्यावर पोलिसांचे छापे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 9, 2023

एमआयडीसी परिसरात ११ टपऱ्यावर पोलिसांचे छापे.

 एमआयडीसी परिसरात ११ टपऱ्यावर पोलिसांचे छापे.

२७,२५८ रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त.. ११जणांवर गुन्हे दाखल.


अहमदनगर :
एमआयडीसी पोलिसांनी एकाच दिवशी एमआयडीसी परिसरातील ११ टपऱ्यांवर छापे टाकत २७ हजरांची सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
याबाबत सविस्तर माहीती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे एमआयडीसी येथील विखे पाटील कॉलेज नगर-मनमाड हवे परिसरामध्ये  पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,  परीसरातील टपरीवर काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेली सुगंधी तंबाखुची विनापरवाना विक्री करत आहेत. अशी बातमी मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पथकातील अंमलदार पो.कॉ. किशोर जाधव पो.ना. पांढरकर पो.ना. चव्हाण यांनी   विखे पाटील कॉलेजच्या गेटसमोर तसेच सहयाद्री चौक, काकासाहेब म्हस्के कॉलेजचे गेटजवळ असे एकूण ११  ठिकाणच्या टपरीवर  छापे टाकून झडती घेतली असता २७ हजार २५८ रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त केली.
याप्रकरणी  गणेश बाळासाहेब घावटे ( वय ३५ वर्ष रा. सोनई ता. नेवासा जि अहमदनगर सध्या राहणार वडगाव गुप्ता ता.जि अहमदनगर), सचिन भाऊराव कोहीले (वय २५ वर्ष रा. गजानन कॉलनी नवनागापुर), शुभम दत्तात्रय हजारे (वय २२ वर्ष रा. केडगाव अहमदनगर ),गणेश आण्णा शिंदे (वय २० वर्ष रा. सावेडी अहमदनगर), लखन नानासाहेब कर्जुले (वय २७ वर्ष रा. तामसवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर सध्या रा. गजानन कॉलनी), मनोज यशवंत कागुणे (वय ३५ वर्ष रा. गजानन कॉलनी नव नागापुर ता. जि. अहमदनगर), पंकज किशोर आकडकर (वय ३६ वर्ष रा. गजानन कॉलनी नवनागापुर), धनराज अनिल मासुळे (२५ वर्ष रा. नवनागापुर ता. जि. अहमदनगर), गणेश प्रकाश निमसे (वय १९ वर्ष रा. अरुण हॉटेल मागे नागापुर ता. जि. अहमदनगर ), विजय उर्फ भोल्या सिंग हरीद्र सिंग( वय २० वर्ष रा. गजानन कॉलनी नवनागापुर), अनिकेत संजय आरडे (वय २१ वर्ष रा. बोल्हेगाव ता. जि. अहमदनगर) हे महाराष्ट्र राज्यात तयार करण्यास व विक्री करण्यास बंदी असलेले वरील वर्णनाची सुंगधी तंबाखु, तसेच तयार माव्याची विक्री करतांना मिळुन आले आहेत , त्यांचेविरुद्ध भादवि कलम २७२,२७३,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
 ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो. नि. राजेंद्र सानप यांच्यासह पथकातील
पो.कॉ. किशोर जाधव पो.ना. पांढरकर पो.ना. संदीप चव्हाण पो.कॉ.सचिन हरदास,चालक पो.ना.युवराज गिरवले आदींच्या पथकाने कारवाई केली.

No comments:

Post a Comment