खंडाळा व नेप्ती येथे गावठी दारू अड्डयावर छापे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 9, 2023

खंडाळा व नेप्ती येथे गावठी दारू अड्डयावर छापे.

 खंडाळा व नेप्ती येथे गावठी दारू अड्डयावर छापे.

नगर तालुका पोलिसांची कारवाई.. एका महिलेसह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर :
नगर तालुक्यातील खंडाळा व नेप्ती शिवारात रानमळा परिसरात नगर तालुका पोलिसांच्या पथकाने हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर छापे टाकून गावठी दारू, दारू तयार करण्याचे साहित्य,कच्चे रसायन असा सुमारे २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या कारवाईत एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 सहाय्यक पोलीस निरीक्षक शिषिर कुमार देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये तीन हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करून २८०० तयार दारू तसेच अन्य साहित्य नष्ट केले. या कारवाईत बाळू उर्फ बाळासाहेब नाथा जपकर राहणार (रा.नेप्ती) पोपट गिरधारी गिरे (रा. खंडाळा)  व एका महिला  विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख,पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग, सहाय्यक फौजदार भरत धुमाळ,पो.ना.राहुल शिंदे, योगेश ठाणगे, संभाजी बोराडे विक्रांत भालसिंग, विशाल टकले यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment