बिंगो जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 4, 2023

बिंगो जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा.

 बिंगो जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा.

1 आरोपीवर गुन्हा दाखल.. 2,76,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त.


अहमदनगर -
एमआयडीसी पोलिसांनी अंजली वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो नावाचा हारजितीचा जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकुन 2,76,580 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून जुगार अड्डा चालवणार्‍या आरोपी दीपक निळकंठ घाटे वय 40 राहणार नागपूर त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज 4 एप्रिल 2023 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अंजली वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ अ.नगर येथे पत्र्याच्या शेडचे मध्ये दिपक घाटे हा बिंगो नावाचा हारजितीचा जुगार लोकांकडुन पैशे घेवून आकडयावर पैसे लावुन खेळत व खेळवित आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पो ना आंधळे, पांढरकर, सानप यांचे पथक बातमीतील नमुद ठिकाणी जावून अचानक साडे बारा वाजता छापा टाकला असता, तेथे एक इसम पत- याचे शेड मध्ये 0 ते 9 आकडे लीहलेले कागद व समोर एल सी डी स्क्रीन लावलेली व त्याचे समोर तीन ते चार लोक उभे असलेले व त्याचे समोर एक 0 ते 9 असे आकडे लिहलेले कागदी पान समोर ठेवून त्यावरील आकडयावर पैसे लावलेले दिसलेने तेथे उभे असलेले लोक पोलीस आल्याचे पाहुन पळुन गेले बसलेला इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी जागीच पकडले व त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव दिपक निळकंठ घाटे वय 40 रा. नागापुर अ.नगर असे सांगीतले. त्याची झडती घेतली असता, त्याचे कब्जात बिंगो जुगाराचे साधने मिळुन आले त्याच्याकडे तेराशे 80 रोख रुपये दोन लाख साठ हजाराची स्विफ्ट गाडी पंधरा हजाराची सॅमसंग कंपनीची एलसीडी स्क्रीन असा एकूण दोन लाख 76 हजार 580 असा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी आरोपी दिपक घाटे यास स्विप्ट गाडी कोणाची आहे. याबाबत विचारपुस करीता त्याने सदर स्विप्ट गाडी हि मीच बिंगोची स्क्रीन व साहित्य आणने नेणे करीता वापरतो असे सांगीतले. वरिल वर्णणाच्या व किंमतीच्या मुदद्देमालासह आरोपी दिपक निळकंठ घाटे वय 40 रा. नागापुर अ.नगर हा मिळुन  आरोपी व मुददेमाल ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस अंमलदार पांढरकर, आंधळे, सानप आदी कर्मचार्‍यांनी सदरची कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment