श्री स्वामी समर्थ बँकेला ५ कोटी ८१ लाखांचा नफा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 3, 2023

श्री स्वामी समर्थ बँकेला ५ कोटी ८१ लाखांचा नफा.

श्री स्वामी समर्थ बँकेला ५ कोटी ८१ लाखांचा नफा.
निघोज - जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेला चालू आर्थिक वर्षामध्ये ५ कोटी ८१ लाख रुपये नफा झाला आहे. त्यामधून २ कोटी ७६ लाखांच्या तरतुदी करून निव्वळ नफा ३ कोटी ०५ लाख रुपये झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. अशोकराव शेळके यांनी दिली.
बँकेची चालू आर्थिक वर्षात ठेवींमध्ये २९ कोटींची वाढ झाली असून मुख्यकार्यालयासह ११ शाखांच्या माध्यमातून २२० कोटी ४४ लाख रुपये ठेवींचा टप्पा गाठला आहे. १२६ कोटी ०५ लाख रुपये कर्ज वाटप केलेले आहे. बँकेचा एकूण एकत्रित व्यवसाय ३४६ कोटी ४९ लाख रुपये  असून गुंतवणूक ११९ कोटी ३९ लाख इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेचा सी.डी. रेशो ५७.२१ टक्के आहे.कर्ज वसुलीबाबत बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली असून ढोबळ एन.पी.ए.चे प्रमाण०.३३ टक्के राखत निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्के आहे.तसेच थकबाकीचे प्रमाण ०.५६ टक्के आहे . बँक लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करणार आहे.
बँक सर्वार्थाने ग्रामीण भागात व पारनेर सारख्या सतत दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या तालुक्यात असूनही आज अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील एकूण ११ शाखांच्या माध्यमातून सेवारत असून या वर्षी बँक “रौप्य महोत्सव” साजरा करत आहे.तसेच बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र झालेले आहे. स्थापनेपासूनच बँकेस सतत ऑडिट वर्ग “अ” मिळत आला असून,बँकेने सुरुवातीपासूनच कायम नफ्यात राहून निव्वळ अनुत्पादित (NPA) कर्जाचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळवलेले आहे. तसेच आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ माध्यमातून युवा वर्गाला व्यवसाय प्रोत्साहनासाठी सहाय्य बँकेच्या मार्फत करण्यात आले आहे. तसेच डिजीटलायझेशन करण्याच्या दृष्टीने बँकेने महत्वाचे पाऊल टाकले असून एटीएम कार्ड, मोबाइल अॅप मार्फत IMPS/RTGS/NEFT ई सुविधा चालू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात UPI सुविधाही कार्यान्वीत होणार आहे.
तसेच नुकतेच रिझर्व्ह ऑफ इंडियाने बँकेस अहमदनगर जिल्ह्यातील कान्हूरपठार व सूपा तसेच पुणे जिल्ह्यातील बेल्हे व चिखली (मोशी) अशा चार नवीन शाखांना मान्यता दिलेली आहे.

No comments:

Post a Comment