सुपा औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामगारांची फाशी घेऊन आत्महत्या... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 25, 2023

सुपा औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामगारांची फाशी घेऊन आत्महत्या...

सुपा औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामगारांची फाशी घेऊन आत्महत्या...
पारनेर - पारनेर  तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील  कंपनीत एका परप्रांंतिय कामगाराने कंपनीच्या कामगार चाळीच्या रहात्या खोलीत  फाशी घेऊन आत्महत्या केली असुन आत्महत्याचे कारण समजु शकले नाही. 
याबाबत  सुपा पोलिसांनी  दिलेल्या  माहीतीत म्हटले आहे  अमित गजेद्र प्रसाद यादव वय ३४  रा उत्तर प्रदेश हल्ली मुक्कामी सुपा असे मयत व्यक्तीचे नाव असुन शुक्रवारी रात्री तो जुन्या सुपा औद्योगिक वसाहतीतील  एका   कंपनीतील  कामगार चाळीत सहकारी मिञा बरोबर रहात  होता. शुक्रवारी रात्री  आठ ते नऊ च्या दरम्यान मित्र त्याला जेवनासाठी घेऊन जात आसताना . मि फोनवर बोलत आहे तुम्ही जेवायला जा म्हणून रुमवर थांबला  होता मिञ जेवून आल्यावर दरवाजा  आतुन बंद आसल्याने बाहेरील मिञानी आवाज देऊन उघडण्सास सांगितले पण आतुन काही प्रतिसाद न मिळाल्याने मिञानी बाहेरून डोकावून पाहिले आसता  आतमध्ये  अमित यादव याने पुठ्ठा  खोके पाँक करण्याच्या  नायलॉन पट्टीने रुम मधील ॲंगलला फाशी घेतल्याचे  आढळून आले. 
तेथील रहवाशी कामगार व सुपा पोलिसांनी तात्काळ त्यास रुग्णालयात दाखल केले असता त्यांस डॉक्टरांनी मृत घोषीत केले . सुपा पोलिसांनी मृत देह नगर येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन पुढील सोपस्कार पार पाडले.मृताचे नातेवाईक  यु पी वरुन येईपर्यंत पोलिस अधिकारी संपत खैरे यशवंत ठोबरे  कंपनीचे वरिष्ठ अधिकारी  अमोल चौधरी  यांनी रितसर प्रोसेस करत मृतदेह नगर येथील शित गृहात ठेवण्यात आला आहे. 
सदर मृत कामगार मागील काही दिवसापासून सुपा येथे रहात होता  त्याच्या कौटुंबिक काहीतरी   वाद होता अनेकदा तो तनावात जानवत असे  त्याच्या सहकार्याचे म्हणने आहे. घटनेच्या दिवशीही तो फोनवर जास्त बोलत होता   असे त्याच्या  सहकार्याने  सांगितले.   सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली  सुपा पोलिस पुढील तपास करत आहे.

No comments:

Post a Comment