पारनेरला तालुका लॅबोरेटरी असोसिएशनच्या चर्चा सत्रास उत्तम प्रतिसाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 27, 2023

पारनेरला तालुका लॅबोरेटरी असोसिएशनच्या चर्चा सत्रास उत्तम प्रतिसाद.

 पारनेरला तालुका लॅबोरेटरी असोसिएशनच्या चर्चा सत्रास उत्तम प्रतिसाद.


नगरी दवंडी 
पारनेर - पारनेर तालुका लॅब टेक्निशियनना अद्यावत वैद्यकिय तंत्रज्ञान व त्यांची माहिती व्हावी, लॅब टेक्निशियनला दैनंदिन उद्भभवणाऱ्या समस्या व उपाय, संघटनेमध्ये सुसंवाद साधला जाणे, व संघटनेच्या नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करणे या विषयांना अनुसरून असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अनालिस्ट अँड प्रॅक्टिसनर पारनेर तालुका यांच्या वतीने पारनेर शहरातील पुष्कराज मीटिंग हॉल मध्ये विषेश चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी पी एम सी सदस्य, सचिव कुमार पाटील होते  त्यांच्या शुभहस्ते प्रथम सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.तर प्रमुख उपस्थिती मध्ये पारनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुदाम बागल,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष निनाद अकोलकर, सचिव भीमराज सानप,उपाध्यक्ष नारायण कोल्हे, खजिनदार विनोद सोळंकी, सल्लागार विजय अरसुळे, डॉक्टर दत्तात्रय श्रीमंदीलकर, माजी अध्यक्ष डॉ सादिक राजे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश बडवे, सानप दत्तात्रय, कर्जत पदाधिकारी संतोष बालगुडे, मनोज वाघमारे,, नेवासा पदाधीकारी संभाजी करजुले, संभाजी पवार, पाथर्डी पांडुरंग काकडे,पारनेर तालुका क्लिनिकल लॅब टेक्निशियन अध्यक्ष श्याम पटारे,उपाध्यक्ष आदिनाथ मंचरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी कुमार पाटील म्हणाले की, पारनेर तालुक्यातील लॅब टेक्निशियन यांना येणाऱ्या समस्या सोडविणे व त्यांचा पाठीशी खंबीर पने उभे राहणे हे संघटनेचे आद्य कर्तव्य आहे. संघटनेच्या माध्यमातून लॅब टेक्निशियन करिता विविध प्रकारचे अद्यावत माहिती व तंत्रज्ञान आधारित शिबिरे राबविणे, लॅब टेक्निशियांचे समस्यांचे निराकरण करणे, महिन्यातून एकदा सुसंवाद साधण्यासाठी बैठक आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्यास सहकार्य केले जाईल. तसेच या प्रसंगी डॉ. सादिक राजे, डॉ. श्रीमंदीलकर, भीमराज सनाप, निनाद अकोलकर, श्याम पटारे आदींनी मनोगत व्यक्त केले.
चर्चा सत्राचे आयोजन करण्यासाठीं लॅब टेक्निशियन अब्दुल सय्यद, सारंग कुलकर्णी, अप्पासाहेब मुठे, बाबाजी हांडे, विशाल दरेकर, संदेश खामकर, अक्षय गोरे, वैभव शिंदे, दिनेश भुजबळ, राहुल थोरात, मेहेर शंकर, गौरव माघाडे, सुधीर जासूद, गाडीलकर सर,बाळासाहेब दिघे, ओंकार वाळुंज, गणेश कुटे, योगेश नाईक, वाघ निलेश, सौ. काजल जावळे, संतोष शिरसागर, प्रशांत निंबाळकर, अमोल धायगुडे, प्रशांत छातिषे, राहूल सोनुळे, आदेश लांडगे, शुभम जाधव, संतोष गुंजाळ, असलम पठाण, पवन देवकुले, शुभम शिंदे आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment