जिल्हातील अनाधिकृत पिरबाबा दर्ग्याचे अतिक्रमण न काढल्यास मनसे चालवणार बुलडोझर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 25, 2023

जिल्हातील अनाधिकृत पिरबाबा दर्ग्याचे अतिक्रमण न काढल्यास मनसे चालवणार बुलडोझर.

 जिल्हातील अनाधिकृत पिरबाबा दर्ग्याचे अतिक्रमण न काढल्यास मनसे चालवणार बुलडोझर - मनसे नेते अविनाश पवार.


पारनेर -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्यासाठी वेळो वेळी महाराष्ट्रातील जनतेसाठी समाज हिताचे मोठ मोठी कामे अल्पावधीतच करुन तमाम मराठी माणसाचा विश्वास संपादन केला असुन राज साहेब यांच्या सुचक वक्तव्यानुसार पक्ष जास्त काळ सत्तेपासून दूर रहानार नाही याचे चित्र पाडव्याच्या मेळाव्यातुन स्पष्ट झाले आहे.
राज साहेबांनी पाडव्याच्या मेळाव्यात अता पर्यंत च्या कामाचा पारदर्शी  लेखाजोखा जनतेसमोर सादर केला राज्यातील सत्ताधारी विरोधकांना सुचक सल्ले ही देण्यात आले, त्याचबरोबर राज्यातील  प्रत्येक नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला तसेच भोंगा मुक्ती आंदोलनानंतर अनाधिकृत पिर बाबा दर्गा यावर बुलडोजर चालवण्याचे आदेशही प्रशासनाला,सरकार ला देण्यात आले महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांनी भोंगा मुक्ती आंदोलना नंतर अनाधिकृत पिर बाबा दर्गा हटाव या मोहिमेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. नगर जिल्ह्या महाराष्ट्रात विस्ताराने  मोठा असुन जिल्हात अनेक ठिकाणी अनाधिकृत पिर बाबा दर्गाचे वाढते प्रमाण घातक असुन जिल्ह्यातील नागरिकांनी अशा अनाधिकृत पिर बाबा दर्गा विषयीची माहिती प्रशासनाला देऊन कार्यवाही न झाल्यास मनसे पदाधिकार्याना संपर्क साधावा प्रशासनाने टाळाटाळ केल्यास अनाधिकृत पिर बाबा दर्गा वर मनसेचा बुलडोझर चालवण्यात येइल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी असे नगर जिल्ह्याचे मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment