राष्ट्रवादीचे दादासाहेब दरेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 21, 2023

राष्ट्रवादीचे दादासाहेब दरेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश.

 राष्ट्रवादीचे दादासाहेब दरेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश.

खा. विखे व माजी मंत्री  कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची ग्वाही.


नगरी दवंडी / प्रतिनिधी 
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष युवा कार्यकर्ते, शिराढोन गावचे उपसरपंच दादासाहेब दरेकर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित रुई छत्तीसी येथील कार्यक्रमात भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
दादासाहेब दरेकर यांनी गेल्या पाच वर्षापासून नगर तालुक्यात मोठे प्रस्थ निर्माण केले आहे असून लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन खूप मोठी तरुणांची फळी निर्माण केली आहे.,त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खासदार डॉ.सुजय विखे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे यावेळी दरेकर यांनी सांगितले.
भाजपने संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात अनेक मोठी विकास कामे मार्गी लावली आहेत,त्यांच्या दूर दृष्टीतून काम करण्याची संधी मिळाल्यास सामान्य व्यक्तींना अनेक योजनांचा लाभ मिळवून देता येईल असेही दरेकर म्हणाले. दरेकर यांनी शिराढोण गावातून ग्रामविकासाची चळवळ उभी करत ,वाळकी गटात अनेक वेळा आरोग्य शिबिरे आयोजित करून अनेकांना मोठा आधार दिला आहे.आगामी काळात भाजपची विचारधारा घरोघरी घेऊन जाण्याचे कार्य केले जाईल असे सर्व तरुण कार्यकर्त्यांनी यावेळी  सांगितले.

No comments:

Post a Comment