छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खर्‍या अर्थाने रयतेचा राजा ः महापौर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 10, 2023

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खर्‍या अर्थाने रयतेचा राजा ः महापौर

 छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खर्‍या अर्थाने रयतेचा राजा ः महापौर

शिवाजीनगरचा राजा व नगरसेवक शाम नळकांडे मित्र मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्साहाने साजरी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख असायचे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदार्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. रामायण, महाभारतात विविध राजांचे दाखले दिले जातात. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. पण महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही. असं प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे.
नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगरचा राजा व नगरसेवक शाम नळकांडे मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी महापौर रोहिणी ताई शेंडगे म्हणाल्या की, महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे. असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले की, गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले, तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे 400 गड-किल्ले होते, असे सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणार्या धारकर्यांना ‘मानकरी’, भाला फेकणार्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणार्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.
शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम याप्रसंगी म्हणाले की, स्वराज्य मिळाल्यानंतरही महाराजांचे विविध खात्यांचे नियोजन करणारे अष्टप्रधान मंडळ हे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे 400 गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते. असेही ते म्हणाले.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, महिला बाल कल्याण सभापती पुष्पाताई बोरुडे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, अनिल बोरुडे, नगरसेवक दत्ता कावरे, शाम नळकांडे, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, अरुण गोयल, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, भाकरे महाराज, संजय आव्हाड, आण्णा घोलप,  वैशाली नळकांडे, मनीषा नळकांडे, सुरेखा नळकांडे, प्राजक्ता बांगर, सुवर्णा पवार, तेजस्वी गडाख, स्नेहल गडाख, गोवर्धन नळकांडे, आघाव गुरुजी, गणेश शिंदे, सुबोध कुलकर्णी, राऊत मामा, दत्तात्रय पारखे, संतोष नळकांडे, गोरख तकपिरे उमेश शिरसागर, सागर गुंजाळ, सुशांत शिंदे, प्रवीण लोखंडे, तुकाराम पवार, गौरव क्षीरसागर, भैय्या गडाख, प्रज्वल नळकांडे, कृष्णा शिंदे, गौरव क्षीरसागर, युवराज नळकांडे, संदीप धारकर, सौरभ शिरसागर, आनंद शिंदे, यश चितळे, सोनू लाहोर, निशांत दळवी, योगेश बांगर, भूषण तिरमल, ओम काळे, उमेश कटारिया, अभिषेक टेकाळे, ईश्वर सचदेव यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment