गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना प्रभावपणे राबविणार : देवेंद्र फडणवीस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 11, 2023

गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना प्रभावपणे राबविणार : देवेंद्र फडणवीस

 गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना प्रभावपणे राबविणार: देवेंद्र फडणवीस 

अण्णांचा ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरणार...!

कन्हैया अर्ग्रो प्रकल्पाच्या नव्या प्रकल्पाचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन...!


नगरी दवंडी 
पारनेर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हि हजारे यांची आवडती योजना आता सरकार प्रभावी पने राबविणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. पारनेर तालुक्यातील उद्दोजक मच्छिंद्र लंके आणि सुरेश पठारे यांच्या कन्हैया अर्ग्रो प्रकल्पाच्या गटेवाडी येथील नव्या प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श गाव संकलप आणि प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, नगर पालक मंत्री राधकृष्ण विखे पाटील, यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने अर्थ संकलपात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांची माहिती दिली. फडणवीस म्हणाले हजारे आणि पवार यांच्या प्रेरणेतून जलयुक्त शिवार योजना मधल्या काळात राज कारणामुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सूरू करत आहोत. हजारे यांची खूप दिवस झाली भेट झाली नव्हती. फोन वर बोलणे होत होते. या कार्यक्रमाच्या निमत्ताने त्यांची भेट होणार असल्याने आपण येथे आलो आहोत. हजारे यांच्या विचारातील गाळमुक्त धोरण आणि गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. यातून धरणातून गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण सक्षमता वाढेल. आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल. यातुन गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. असे फडणवीसांनी सांगितलें.
पशुधनाचे महत्त्व सांगताना फडणविस म्हणाले, आपल्या संस्कृतीत गायीची पूजा केली जाते. गायीला माता मानले जाते. सुरवातीला यावर जगातील काही मंडळी हसत होती. आता माञ सर्वांनी मान्य केले आहे.शेतकऱ्यांचे प्रगती साठी पशुधन महत्वाचे आहे. शेती आणि पशू खाद्य क्षेत्रातही नैसर्गिक उत्पादने आणि दर्जा यावर भर दिला पाहिजे. पशुखाद्य क्षेत्रात हे काम यशस्वी करण्याकरिता आवश्यक ती प्रचार प्रसार मोहिम राबविण्यास सरकार तयार आहे. मच्चिंद्र लंके आणि सुरेश पठारे यांच्या सारख्या उदोजक यांनी पुढाकार घेतला तर सरकार नक्कीच या मध्ये काम करण्यास तयार आहे. रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन नैसर्गिक शेतीला चालना मिळाली तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चात बचत होऊन नफा वाढेल. शेतकर्यांचे प्रश्र्न सोडवताना या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. राळेगण सिद्धी येथून सौर कृषीपंप फिडर योजना सुरू झाली. ती कमालीची यशस्वी झाली. त्या मुळे आता पुढील टप्पा सुरू करत आहोत. त्यामुळें शेतकऱ्यांना स्वस्तात आणि दिवसाही वीज मिळण्यास मदत होईल. असे फडणविस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment