पारनेर बसस्थानक चौकात कोयता गँगचा धुडगूस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 8, 2023

पारनेर बसस्थानक चौकात कोयता गँगचा धुडगूस.

 पारनेर बसस्थानक चौकात कोयता गँगचा धुडगूस.

दोन गटात लाथा बुक्क्यांनी हाणामारी.


पारनेर -
काही दिवसापूर्वी म्हसणे येथील जंबे गँगने पारनेर शहरात धुडगूस घातला होता. या प्रकरणी काही तरुणांवर गुन्हेहि दाखल झाले होते. या जंबे गँग मधील तरुणही पारनेर येथील तरुणांवर चालून आले. त्या वेळीं त्यांच्या हातात कोयते होते. पुण्यामध्ये कोयता गँगचा धुडगूस सुरु असताना म्हसणे येथील जबे गँगलाही कोयत्त्यांची भुरळ पडली असुन. कोयते घेउन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या गँगला जरब बसवली असून तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. हि घटना ताजी असतानाच बुधवार दि८ रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पारनेर शहरातील तरुणांना मधील दोन गटांत बाचाबाची होऊन त्याचे हाणामारीत रुपातर झाले. बसस्थानक शेजारी एकाला काही तरूनानी झटापट करत दोघात लाथा बुक्क्यांनी हाणामारी झाली. त्यातील काही तरूण लोणी रोड कडे पळाले. नंतर बसस्थानक परिसरात ज्या तरुणाला हानमार झाली होती. त्यांनी लगेच मोबाईलवर फोन करुन मित्रांना बोलून घेतले. काही मिनिटात त्या ठिकाणी मित्र आल्यावर सर्वांनी मिळून लोणी रोड कडे असलेले काही तरुणांवर चाल करुन गेले. त्यात त्यांची तुंबळ हाणामारी झाली. पुण्या मुंबईला लाजवेल असा सीन या हाणामारीत दिसत होता. या झटापटीत मद्यस्ती करणाऱ्या एका युवकाला कोयता लागल्याने हाताला जखम झाली. दोन्ही गट एकमेकाला भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली. पाच ते दहा मिनिटे हाणामारी चालु होती. लागलीच जागरूक नागरिक यांनी पोलिसांना फोन केल्याने पोलीस पथक घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थ टळला. हा सर्व प्रकार पारनेर शहराच्या दृष्टीने घातक आहे अशी चर्चा शहरात चालु आहे. वेळीच या गँग ला जरब बसवण्याचे कसब पोलिसांना दाखवावे लागणार आहे.
कोयता गँग चा धाक दाखवून पारनेर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँग ने पारनेर शहरातही आपले बस्तान बसविन्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 
कोयता गँग ने धुडगूस घालून पारनेर शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. जेणे करुन पुन्हा अश्या घटणा घडणार नाही. पारनेर चा वाढता विस्तार पाहता पारनेर बसस्थानक चौकात जास्तीत जास्त पोलिस बळाची आवश्यकता आहे. जेणे करुन नागरिक व व्यवसायिकांना सुरक्षित वाटेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here