कांदाभाव गडगडल्याने राष्ट्रवादीचे सुपात शनिवारी जन आक्रोश आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 3, 2023

कांदाभाव गडगडल्याने राष्ट्रवादीचे सुपात शनिवारी जन आक्रोश आंदोलन

 कांदाभाव गडगडल्याने राष्ट्रवादीचे सुपात शनिवारी जन आक्रोश आंदोलन.

टाकळी ढोकेश्वर पोलिस ठाण्यासह कांदाप्रश्नी विधानसभेत आमदार निलेश लंकेची लक्षवेधी.

पुर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी.


नगरी दवंडी 
पारनेर - पारनेर नगर मतदार संघ विस्ताराने मोठा असून टाकळी ढोकेश्वर याठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पोलीस ठाणे मंजूर होवुनही अद्याप पर्यंत सुरू झाले नाही.तर दुसरीकडे कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून कांद्याला हमीभाव द्यावा या प्रमुख मागण्यांसह तालुक्यातील इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी लक्षवेधी सूचना मांडली आहे.तर दुसरीकडे पुर्ण दाबाने वीज पुरवठा सुरळीत करावा व शेतकरांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी विधानसभेच्या लक्षवेधी दरम्यान केली आहे.
विधानसभेत या पुरवणी मागणी संदर्भात आमदार निलेश लंके यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे माझ्या मतदारसंघातील टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पोलीस ठाणे मंजूर झाले आहे परंतु ते अद्याप सुरू झालेले नाही. टाकळी ढोकेश्वर येथील पोलीस ठाण्यासंदर्भात अध्यापर्यंत गृह विभागाच्या वतीने कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे तातडीने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी विधानसभेच्या लक्षवेधी दरम्यान केली आहे. तर दुसरीकडे माझा मतदारसंघ हा विस्ताराने मोठा असून या ठिकाणी पुरेसे पोलिस संख्या बळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पण या लक्षवेधी दरम्यान करण्यात आली आहे. तसेच पारनेर व सुपा पोलीस ठाण्याचे जे कर्मचारी पोलीस कॉलनी मध्ये राहतात त्यांच्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली आहे.
तर विधानसभेमध्ये लक्ष्यवेधी दरम्यान बाब क्रमांक १८ मध्ये आमदार निलेश लंके यांनी सध्या कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे भाव कोसळल्याने हवालदिल झाला आहे. एकीकडे कांदा पीक घेताना खते औषधे बियाणे व मजुरीत भरमसाठ भाव वाढ झाल्याने मुद्दल सुद्धा वसुल होत नाही त्यामुळे कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी लक्षवेधी दरम्यान केली आहे. तर दुसरीकडे या लक्षवेधी दरम्यान बाब क्रमांक ४४ मध्ये माझ्या मतदारसंघातील नगर मनमाड रस्त्या.. हा रस्ता म्हणजे देशात महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेले श्री शिर्डी साईबाबा मंदिराकडे जाणारा हा रस्ता असुन मागील काही वर्षांमध्ये या रस्त्याच्या कामासंदर्भात निविदा प्रसिद्ध करून ते काम पण सुरू झाले होते. परंतु सदर ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवले असून खराब रस्त्यामुळे असल्यामुळे दोनशे ते अडीचशे जणांना आपला जीव अपघातामध्ये गमाव लागला आहे. या रस्त्या संदर्भात आता पुन्हा एकदा निविद्या प्रसिद्ध करण्यात आली असून नवीन ठेकेदार कडुन चांगला व दर्जेदार असता करून घ्यावा अशी आव्हान आमदार निलेश लंकेने लक्ष देऊन निर्माण केले आहे. या लक्षवेधी दरम्यान बाब क्रमांक ७७ मध्ये ऊर्जा विभागाच्या बाबतीत सध्या महावितरण कंपनीच्या वतीने भारनियमनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे त्यामुळे यापुढील काळात महावितरण कंपनीच्या वतीने जास्त दाबाने वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी आमदार निलेश लंके लक्षवेधी दरम्यान केली आहे. पळवे या ठिकाणी ३३ के.व्ही‌.चे वीज उपकेंद्र सुरू करण्यात यावे तर माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी रोहित रे जळाले असून महावितरण व महापारेषण कंपनीच्या वतीने तातडीने शेतकऱ्यांना हेरवित्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी या लक्ष दरम्यान शेतकऱ्यांसाठी केली आहे.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुपात जन आक्रोश आंदोलन..
सध्या कांदाला रूपया दोन रुपया कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी दि ४ मार्च रोजी नगर पुणे महामार्ग सुपा येथे रस्ता रोको करून जन आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासंबंधीची निवेदन तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या असून या रस्ता रोकोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा आमदार निलेश यांनी केले आहे.गेल्या अनेक वर्षापासून केंद्र व राज्य सरकारकडे कांदा शेतकऱ्यांना किमान कांद्याला १५ ते २० रुपये किलो हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच केंद्र सरकारने कांद्या वरील निर्यात बंदी ही कायमस्वरूपी उठवावी . कांदा पण शेतकऱ्याला प्रति किलो दोन रुपये अनुदान शासनाने द्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment