वादग्रस्त पोलिस निरीक्षक गोकावे निलंबित.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 2, 2023

वादग्रस्त पोलिस निरीक्षक गोकावे निलंबित..

 वादग्रस्त पोलिस निरीक्षक गोकावे निलंबित..

सुपा ग्रामपंचायत व व्यावसायिकांनी केला फटाके वाजवून जल्लोष....


नगरी दवंडी 
पारनेर - वादग्रस्त ठरलेल्या तालुक्यातील सुपा पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने सुपा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व व्यावसायिक यांनी बुधवारी दुपारी सुपा मेन चौक व मलबारी चौक येथे फटाके वाजवून जल्लोष केला.
महिन्यांपूर्वी मलबारी चौक येथील पानटपरीवर कोयता गॅंगने दहशत निर्माण केली होती. या पार्श्वभूमीवर सरपंच मनिषा योगेश रोकडे यांनी विशेष ग्रामसभा घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. व भविष्यात अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी सुपा पोलीस स्टेशनला कर्मचारी वाढवून मिळावेत यासाठी पत्र व्यवहार केला. ग्रामपंचायतीने पत्र दिलेच कसे याचा राग येऊन दुसऱ्या दिवशी रात्री ११ नंतर पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे आपल्या फौजफाट्यासह चौकात दाखल झाले.व पानटपरी,हारविक्रेते, बेकरी व्यवसाय करणारे दुकाने बंद करू लागले. यावेळी सरपंच पती योगेश रोकडे यांना ही माहिती समजली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिस निरीक्षक गोकावे यांना जाब विचारला की गेली दोन ते अडीच वर्षांपासून आपण याठिकाणी नोकरी करता जोपर्यंत हाप्ते सुरळीत चालू होते तोपर्यंत तुम्हाला चालले आता का तुम्ही रस्त्यावर उतरून दुकाने बंद करता यावर गोकावे व रोकडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये गोकावे सांगतात की, तुमच्या फायद्यासाठी दुकाने बंद करत नव्हतो.
हाप्तेखोरीत माहेर असलेल्या गोकावे यांच्या विरोधात सुपा ग्रामपंचायत व व्यावसायिक यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील व पोलिस अधीक्षक ओला यांच्याकडे  तक्रारींचा पाढाच वाचला.यावर नामदार विखे यांनी तातडीने प़ोलिस अधिक्षक यांना याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.
याच दरम्यान सुपा टोलनाक्यावर एका महीलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत सुपा टोलनाक्याच्या सी सी टि व्ही फुटेज मध्ये सुपा पोलिस स्टेशनची गाडी टोलनाक्यावर पुण्याकडून येताना दिसते. थोड्या वेळेत तेथे एक कार येते ती कार तेथे थांबल्यानंतर पोलिस गाडीतून पोलिस निरीक्षक गोकावे खाली उतरतात व त्या गाडीत जाऊन बसतात. गाडीत असलेल्या महिलेशी त्यांचे जोराचे भांडण होते. थोड्या वेळेने ती व्यक्ती व एक महिला त्या गाडीतून उतरतात व भर रस्त्यावर त्या दोघांच्यात बराचवेळ झटापट होते. याकाळात ती महिला व पोलिस आधिकारी यांच्यात भर रस्त्यावर झटापट होते. तर कधी  पोलिस अधिकारी व गाडी चालक दोघे मिळून त्या महिलेला मारहाण करतात व  उचलण्याचा प्रयत्न करतात. तर कधी त्या महिलेला पाणी, फोन देत आसल्याचे त्या क्लिपमध्ये दिसत  आहे.  यांचा अर्थ त्या महिलेला ते पोलिस निरीक्षक ओळखत असावे तर मग ती महीला कोण याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 
दरम्यान पोलिस निरीक्षक गोकावे यांना निलंबित केल्याची माहिती मिळताच सुपा शहरात व्यावसायिक यांनी सरपंच पती योगेश रोकडे व उपसरपंच दत्तात्रय पवार, माजी सभापती दिपक पवार यांचा हार घालून व गुलाब गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पवार, उद्योजक योगेश रोकडे, उपसरपंच दत्तात्रय पवार,फारूक शेख, सुलतान शेख, बाळासाहेब कोल्हे, बापू सोनूळे, बाळू शिंदे, किन्नो खान, राजू पठारे, एकनाथ औचिते, दिपक दिवटे, जब्बार शेख, चंदू कदम, पिंटू आनंदकर, अमोल पवार, विजय पवार, समिर शेख, बंटी मगर यांच्यासह ग्रामस्थ व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment