प्रत्येक भागाच्या विकासाला चालना देणार-महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 2, 2023

प्रत्येक भागाच्या विकासाला चालना देणार-महापौर रोहिणी शेंडगे

 प्रत्येक भागाच्या विकासाला चालना देणार महापौर रोहिणी शेंडगे.

साईराम  सोसायटीत येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा  शुभारंभ.


नगर -
 शहरातील प्रत्येक भागाचा विकास झाला तर शहराचा विकास होत असतो. नगर-कल्याण रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेल्या मुलभूत सुविधांमुळे येथील नागरी वस्ती वाढत आहे. येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध असून, या भागात जास्तीत जास्त कामे कशी होतील, याकडे विशेष लक्ष देत आहे. प्रत्येक भागाच्या सर्वांगिण विकासासाठी जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट याबरोबरच प्रत्येक भागाचा विकास करण्यात येणार आहे. प्रभागातील नगरसेवकांच्या समन्वयातून प्रत्येक भागाच्या विकासाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
प्रभाग क्रमांक 8 मधील महिला बालकल्याण सभापती पुष्पांताई बोरुडे ,नगरसेवक सचिन शिंदे ,शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून  साईराम सोसायटी येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ  महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे ,सुनील शिंदे सर, सोमनाथ बोर्हाडे, उमेश शिरसागर, राजेश पंचमुख, मल्हारी वाव्हळ, शंकर बोरुडे, मच्छिंद्र चौकटे, दिनेश शिंदे, कृष्णा तावरे, वाटमारे सर, दिनेश भडकवाड, आशिर सय्यद, दत्तात्रय पारखे, लांडे मामा, राजळे मामा, सातपुते मामा, श्रीपाद वाघमारे, बाळू वाघ, झावरे पाटील, जगताप, रेपाळे कारभारी, गणेश लयशेट्टी, भागवत, फुलके मामा, अमोल बनकर, राजू जाधव,आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते
याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील प्रत्येक भागाला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न सुरु आहेत. सहकारी नगरसेवक आणि महापौरांच्या माध्यमातून या भागात जास्तीत जास्त कामे कशी मार्गी लागतील यासाठी प्रयत्नशिल आहोत. नागरिकांच्या मागणीनुसार प्रत्येक भागातील कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येत आहे. मागील काळात ड्रेनेज, स्ट्रीट लाईट आदिंची कामे करण्यात आली आहे, आता रस्त्यांच्या कामांना प्राध्यान देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी परिसरातील नागरिक  गायकवाड, पठाण चाचा, अक्षय सूर्यवंशी, बबलू गोंडा, हसन पठाण, रमेश मारपेल्ली, सय्यद खलील, भास्कर केदार, राजेंद्र शंकर औटी, गणेश औटी, सागर वैराळ, महेश लोखंडे, राजू जिंदम, प्रकाश नांगरे, गणेश चव्हाण, मंदा सातपुते, शकुंतला शिंदे, निर्मला चौकटे, शिल्पा बोर्हाडे, बाली नागरे, वैजयंता लोखंडे, लता लोखंडे, सुरेखा छिंदम, शेख, शिंदे मावशी, उषा डागवाले, मंदा सातपुते, हिराबाई बोरुडे, शेख शेहकन, अलका गायकवाड, पुष्पा ढाकणे, मंगल राजक, राजू तिवारी, कमल वाटमारे, सुरेखा बिडकर, प्रणाली सूर्यवंशी, शिला तिवारी, शिंदे बाई, सायरा सय्यद, शोभा भोसले, सुजाता भोसले, संगीता बेरड, गोदावरी भवर, लता भागवत, मिराबाई रेपाळे, वसुदा झावरे, मंदा घोरपडे, संगीता वैराळ, विश्वता घोरपडे, पठाण, कमल शिरसागर, आरती मारलेल्ली, अंजनाबाई बनकर, अनुराधा भडकवाल, मनीषा जाधव, प्रेमा दैवत, सुनिता तिवारी, छाया सरोदे, अनुसया मारलेल्ली, मालन शिंदे. आदी उपस्थित होते
याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे ,सचिन शिंदे, अनिल बोरुडे, आदिंनी मनोगत व्यक्त केले. आभार सचिन शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment