अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात बेमुदत काम बंद आंदोलन ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 25, 2023

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात बेमुदत काम बंद आंदोलन !

 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात बेमुदत काम बंद आंदोलन !

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार - आ. निलेश लंके.


पारनेर -
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी यापूर्वीही वारंवार आंदोलने केले आहेत . परंतु त्यांना आज पर्यंत ईश्चित असे यश न मिळाल्यामुळे तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी 20 फेब्रुवारी 2023 पासून काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे .व त्या आशयाचे निवेदन शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस माता भगिनींनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना दिले असून ,माझ्या माता भगिनींची होणारी ससेहोलपट मी पाहत आलो आहे .मीळनार्या मानधनात कुटूंब चालवीनेही आवघड आसताना त्यांना मानधना ऐवजी वेतन मिळावा यासाठी मी प्रयत्नशील राहील व माझ्या माता भगिनींना ते मिळवून देईल असे आमदार लंके यांनी सदर महिलांना आश्वासित केले. 
महाराष्ट्रातील २ लाख सेविका मदतनीस यांना आपल्या मागण्यासाठी संप करण्याची वेळ यावी ही कोणालाही भूषणावह बाब नाही. २०१७ सालात अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधन वाढ दिली गेली. त्यानंतर महागाई फार मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मासिक उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस महागाईने होरपळल्या आहेत. अशा स्थितीत शासनाने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने केला नाही त्यामुळे संपाची स्थिती निर्माण झाली आहे . असे खेदाने नमूद करीत आहोत. आसे सदर निवेदनात म्हटले आहे . नाविलाजाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला बेमुदत संपाची घोषणा करावी लागली.
अंगणवाडी सेविका मदतनीस या कामगार आहेत असे सर्वोच्च न्यायालायाने नमूद केले आहे. तरीही सरकारने याची दाखल घेऊन त्यांना कर्मचारी म्हणून जाहीर केले नाही. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कर्मचारी घोषित करावे अशी अनेक वर्षाची मागणी आहे.अंगणवाडी सेविकांना सुमारे ८५०० मिनी अंगणवाडी सेविकांना ६५००/- तर मदतनीस यांना ४५००/- रुपये मासिक मानधन दिले जाते . ते तुटपुंजे आहे. त्यात तातडीने भरीव वाढ करावी व कृती समितीशी वेतनश्रेणीची चर्चा करावी. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना निवृत्ती वेळी मासिक मिळकतीच्या निम्मी पेन्शन मिळावी, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुप्रीम कोर्ट निर्णया प्रमाणे ग्रॅज्युटी द्यावी, इंधनाचे दर वाढल्याने मुलांना पोषण आहार देण्यासाठीच्या दरात वाढ होणे आवश्यक आहे.तसेच चांगला ताजा सकस आहार मिळाला पाहिजे, ऑनलाईन कामांसाठी चांगले दर्जाचे मोबाईल देणे आवश्यक आहे, तसेच पोषण ट्रॅकर अॅप मराठीत असले पाहिजे. अशा महत्वाच्या मागण्या कृती समितीने केल्या आहेत.
आपण या मागण्यांना पाठींबा द्यावा व विधान सभेत या मागण्या बाबत प्रश्न उपस्थित करून आवाज उठवावा अशी विनंती आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
तसेच २८ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र भरातील अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान, मुंबई येथे विधानसभा कार्यरत असेल अशा प्रत्येक दिवशी मुक्कामी आंदोलन करणार आहेत. त्यावेळी आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करावे अशी विनंतीही यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश लंके यांना केली. 
यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सौ.नंदा पाचपुते , तालुका प्रतिनिधी सौ. अलकाताई नगरे,तालुका अध्यक्ष सौ . संगीता विश्वास तालुका उपाध्यक्ष सौ शशिकला औटी,  तालुका प्रतीनिधी कल्पना चौरे ,तालुका कार्याध्यक्ष सौ . अरुणा खळेकर माया मिसाळ यांच्यासह आंगणवाडी सेविका मदतनीस व संघटनेच्या शेकडो माता भगिणी यावेळी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment