राजश्री काळे यांचा नगरकरांच्या लोककला संमेलनात गौरव...! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, March 12, 2023

राजश्री काळे यांचा नगरकरांच्या लोककला संमेलनात गौरव...!

 राजश्री काळे यांचा नगरकरांच्या लोककला संमेलनात गौरव...!

कालिका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र सुपा...


नगरी दवंडी 
पारनेर - संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त मुंबईतील  प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात अखिल भारतीय महीला लोककला संमेलन पार पडले. या समारंभात नगरच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी तथा सिने अभिनेत्री राजश्री काळे नगरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लावणी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महीला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर संगीत नाटक अकादमी व डब्लू २० च्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, मुंबई विद्यापठातील शाहीर अमर शेख अध्यसनचे प्रमूख डॉ प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, आदी यावेळी उपस्थित होते.
लावणी सम्राज्ञी राजश्री नगरकर यांनी अकलुजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सव मध्ये सलग ३ वर्ष प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. तसेच बरखा सातारकर या मराठी चित्रपट मधील मुख्य भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला आहे.महाराष्ट्रतील अनेक लावणी महोत्सव बरोबर जपान,नेदरलँड, रशिया, इंडोनेशिया , मध्ये महाराष्ट्रतील अस्सल पारंपरिक लावणी सादर केली आहे.
तसेच प्रजासत्ताक दिना निमित्त नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रतील पारंपरिक लावण्याचा जिवंत देखावा त्यांनी सादर केला होता. सुपे येथील कालिका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्राच्या माध्यमातून त्या लावणी सादर करत असतात. त्यात त्यांना भगिनी आरती काळे नगरकर व इतर महीला कलावंताचे सहकार्य होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here