विरोधकांची राजकीय कारकिर्द सूरू होण्यापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 17, 2023

विरोधकांची राजकीय कारकिर्द सूरू होण्यापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा.

 विरोधकांची राजकीय कारकिर्द सूरू होण्यापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा.


जामखेड -
विरोधकांची  स्वताची राजकीय कारकिर्द सूरू होण्यापुर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी या महामार्गाची मुहर्तमेढ रोवली गेली. अशा महामार्गाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा  प्रयत्न लाजिरवाना असल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी केला आहे.
याबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आमदार प्रा राम शिंदे यांची कर्जत जामखेड तालुके जवळच्या मार्गाने पुण्या मुंबईशी जोडले जावेत ही अनेक वर्षांची इच्छाहोती. तसा पाठपुरावा त्यांनी वेळोवेळी केला. यादरम्यान कर्जत जामखेड तालुके पुणे मुंबईशी जवळच्या मार्गाने या महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार असल्याचे ते प्रत्येक जाहिर सभांमधून सांगत असत.   दरम्यान सन २०१४ मध्ये मंत्री झाल्यानंतर  प्रा राम शिंदे यांनी याकामी पाठपुरावा केला. याकामी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत  सन २०१५ आणि २०१६ या दोन वर्षात या रस्त्याचा प्राथमिक स्तरावर अभ्यास करून  सर्व्हे  करण्यात आला.  याच पाठपुराव्यातून तळेगाव दाभाडे - चाकण - शिक्रापुर - न्हावरा फाटा - श्रीगोंदा- जामखेड - पाटोदा - अहमदपुर महामार्गाला 
सहा वर्षापुर्वी  ३ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात या महामार्गाचे सर्व्हेक्षण , लगतच्या जमिनीचे भूसंपादन  व सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम करण्यात आले.  
दरम्यान ३ जानेवारी २०१७ ही तारीख अशी आहे की, या तारखेला विरोधकांच्या राजकीय कारकिर्दीला सुध्दा प्रारंभ झालेला नव्हता. बारामती तालुक्यातील शिरसुफळ जिल्हा परिषद गटातून ते नंतर दोन महिण्यांनी मार्च २०१७ मध्ये सदस्य झाले होते. ही वस्तूस्थिती आहे.
ज्या महामार्गाच्या पाठपुराव्याला सन २०१४ पासून पाठपुरावा करून,ख-या अर्थाने मुहर्तमेढ रोवली गेल्यानंतर ३ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला.त्यानंतर  सर्व्हेक्षण , लगतच्या जमिनीचे भूसंपादन  व सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे झाले. असे असताना ज्या कामाचा आपला सुतराम सबंध नाही. अशा  कामाचेही श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न लाजीरवाना आहे. विरोधकांकडून  असा पोरकटपणा कायम केला जातो.
मंत्री आणि नेत्यांबरोबर फोटो काढायचे ,व्हिडीओ काढायचे ,स्वताच्याच आजोबांकडून स्वताचेच कौतुक करून घ्यायचे आणि मी कसा पाठपुरावा केला हे सोशल मिडीयामधून दाखवायची विरोधकांची पध्दत जनतेच्या लक्षात आली आहे. जे काम आपण केलेच नाही अशा कामाचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद असून, जनतेची दिशाभूल करणारा आहे. विरोधकांकडून कायम चालु असलेला असा अभासी विकास आणि  भुलभुलैया जनतेच्या आता लक्षात आला असल्याचे अजय काशीद यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

स्वताच्या आजोबाकडून कौतूक करून घेण्याचा  " कौतुक सोहळा "
विरोधकांनी  कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वताचे आजोबा जेष्ठ नेते शरद पवार यांना यापुर्वी चोंडी व कर्जत येथे निमंत्रित केले होते. या दोन्ही कार्यक्रमातून विरोधकांनी  स्वताच्या आजोबाकडून स्वताचेच कौतुक करून घेताना दिसले. त्यामुळे जेष्ठ नेते शरद पवारांचा कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यक्रम हा विरोधकांचा " कौतुक सोहळा " असा कार्यक्रम असतो. असा घणाघात प्रसिध्दीपत्रकात करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment