महाराष्ट्रातील गड व किल्ल्यांचा दोनशे ट्रेक पूर्ण करणारा अवलिया.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 3, 2023

महाराष्ट्रातील गड व किल्ल्यांचा दोनशे ट्रेक पूर्ण करणारा अवलिया....

 महाराष्ट्रातील गड व किल्ल्यांचा दोनशे ट्रेक पूर्ण करणारा अवलिया....

शिवदुर्ग संवर्धन संस्थापक पत्रकार सुरेन्द्र शिंदे यांचा उपक्रम.


नगरी दवंडी/ प्रतिनिधी
पारनेर  ः महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि  एतेहासिक वास्तू जतन करून आपल्या महाराष्ट्राच्या हिन्दू संस्कृतीचे जतन व्हाव. तसेच महाराष्ट्र हा सर्वात जास्त गड किल्ले असणारा महाराष्ट्रातील एकमेव राज्य आहे. राज्याच्या काना कोपर्‍यात गड किल्ले विखुरलेले आहे. तसेच प्रत्येकाचे असे आपले एक भौगोलिक महत्त्व आहे. अश्याच काही गड किल्लेचे आणि गडांचे भौगोलिक महत्त्व जाणून पारनेर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शहांजापुर या छोट्याश्या गावातील गड किल्लेचा ट्रेकर शिवदुर्ग संवर्धन संस्थापक अध्यक्ष पत्रकार सुरेन्द्र शिंदे यांनी गड किल्लेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आता पर्यंत 200 किल्ल्यांचा ट्रेक पूर्ण केला आहे.
पुरातन किल्यांवर वाढलेले गवत, काटेरी झुडूपे, किल्ल्यांच्या पडलेल्या भिंती, ढासळत असलेले बुरुंज, छप्पर उडालेले मंदिरे, दुर्गंधी सुटलेली तलावातील पाणी, तसेच अक्षरशः कचरा कुंडी झालेले किल्ले, प्रारंभीचे काळात अहमदनगर येथील जीवाशी ट्रेकरचे माध्यमातुन महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या याच प्रेरणेतून गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आवड निर्माण झाली.
ट्रेकर पत्रकार सुरेन्द्र शिंदे यांनी रविवारी रायगड जिल्हातील व ठाणे जिल्हातील तिन किल्यांना भेटी देत दोनशे किल्ल्यांचा ट्रेक पूर्ण केला. प्रत्येक महिन्याला एक ट्रेकचे नियोजन केले जात असून यात पाउसाळ्यात भुईकोट किल्ला, तर हिवाळ्यात अवघड श्रेणीचे गिरिदुर्ग तसेच उन्हाळ्यात जलदुर्ग केले जात असुन यामध्ये सह्याद्रीचे गिरिदुर्ग करणे मोठे जिकरीचे असते. ट्रेकर्सच्या शारीरिक व मानसिकतेची एक प्रकारे जीवाची परीक्षाच असते. शिवदुर्ग संवर्धन संस्थापक अध्यक्ष पत्रकार सुरेन्द्र शिंदे व त्यांचे ट्रेकर सहकार्‍यांनी आता पर्यंत महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, गोवा व कर्नाटक राज्यातील शेकडो गड किल्ल्यांचे भ्रमण केले आहे. गड किल्ल्यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीला प्रेरणादायी ठरवा या करिता शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठानव त्यांचे ट्रेकर सहकारी मनापासून प्रयत्न करतात.
गड, किल्यांचे संवर्धन करून जास्तीच जास्त नागरिकांन पर्यंत प्रबोधन करण्यासाठी शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान कटिबध्द आहे असे मत पत्रकार ट्रेकर सुरेन्द्र शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांचे या गड किल्ले संवर्धन बदल थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे, खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील, आमदार निलेश लंके, सभापति काशिनाथ दाते सर,युवा नेते राहुल शिंदे, युवा नेते योगेश रोकडे, उपसरपच दत्ता पवार माजी उपसरपंच सागर मैड, डॉ.बाळासाहेब पठारे , डॉ. अजय येणारे, शिवसेना तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, पत्रकार शरद रसाळ, पत्रकार संतोष सोबले आदींनी या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment