नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार.. फोटो व्हायरल करण्याची धमकी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 4, 2023

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार.. फोटो व्हायरल करण्याची धमकी.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार.. फोटो व्हायरल करण्याची धमकी.


पुणे 
: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता पुण्यातील म्हाळुंगे गावाच्या हद्दीत एका १९ वर्षीय तरुणीवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दोघांविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित तरुणीच्या फिर्यादीनंतर विजयकुमार जनार्धन पोतदार (वय ५५ रा. संकेश्वर डाईन आयकॉन रावेत, ता. हवेली), मिथुन जोगेंदर कुमार दास (वय-२८ रा. सारा सिटी समोर, खराबवाडी, ता. खेड मुळ रा. जोडोमु ता. वडंबा, जि. कटक राज्य ओडीसा ) यांच्याविरोधात आयपीसी ३७६, ५०६, ३४, अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी शोधत असताना पीडित तरुणीला तिची तोंडओळख असलेल्या मुलीने एका कंपनीचा मालक असलेल्या विजयकुमार पोतदार याचा नंबर दिला. त्यानुसार पीडितेने पोतदार याला फोन करुन कामाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर पोतदार याने काम देण्याचे आमिष दाखवून पीडितेला ढाब्यावर नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याचा धक्का बसल्याने तरुणीने विजयकुमार पोतदारला याबाबत विचारणा केली. त्यावेळी पोतदारने "मोबाईलमध्ये तुझे फोटो आहेत. ते व्हायरल करेन", अशी धमकी दिली.
या घटनेनंतर आरोपी पोतदार हा वेगवेगळ्या नंबरवरुन फिर्यादी यांना फोन करुन त्रास देऊ लागला. फिर्यादी यांनी आरोपी पोतदार याला तुझी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोतदारचा मित्र मिथुन याने फिर्यादी यांना फोन करुन "विजयकुमार याने तुझ्यासोबत काय केले हे मला माहित आहे. तू जर त्याच्याविषयी कोणाला काही सांगितले, तर तुझा मर्डर करीन", अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे करत आहेत.

No comments:

Post a Comment