घाणेगाव पाझर तलावातून अनधिकृत बेसुमार पाणी उपसा..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 3, 2023

घाणेगाव पाझर तलावातून अनधिकृत बेसुमार पाणी उपसा.....

 घाणेगाव पाझर तलावातून अनधिकृत बेसुमार पाणी उपसा.....

ग्रामपंचायतीचे तहसीलदारांना निवेदन...


नगरी दवंडी/ प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील घाणेगाव येथील पाझर तलावातील पाण्याचा अनधिकृत पणे बेसुमार पाणी उपसा केला जात असून तो तातडीने बंद करण्यात यावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने  तहसीलदार आवळकंठे  उपविभाग जलसंधारण अधिकारी पंचायत समिती पारनेर यांना ग्रामपंचायत घाणेगाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
चालू वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे हा पाझर तलाव तुडुंब भरला आहे. तसेच या तलावाचा फायदा घाणेगाव, गट्टेवाडी, जातेगांव, पळवे खुर्द, म्हसणे या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. मात्र या ठिकाणी शेतकर्‍यांनी पिकांसाठी अनाधीकृतपणे मोटरी लावून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरु केला आहे. परिणामी याचा भविष्यात फार मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच या तलावालगत गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे काम चालू आहे. या पाझर तलावाला पाणी असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची गरज पडत नाही. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी या पाझर तलावातील अनाधिकृतपणे पाणी उपसा बंद होणे तितकेच गरजेचे आहे. अशी मागणी घाणेगावचे सरपंच दादाभाऊ शेलार यांच्यासह ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन  योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी घाणेगाव, गटेवाडी, म्हस्के सुलतान, जातेगाव, पळवे खुर्द, येथील नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment