सर्व सामान्यांचा महामेरू हरपला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, February 12, 2023

सर्व सामान्यांचा महामेरू हरपला.

सर्व सामान्यांचा महामेरू हरपला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांचे निधनाने पारनेर तालुक्यावर शोककळा...
नगरी दवंडी 
पारनेर - जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ॲड उदय शेळके (वय४६)यांचे निधन झाले. दिर्घ आजार नंतर मुंबई मधील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने पारनेर तालुक्यावर शोककळा. राष्ट्रवादी काँगेस कडून विविध नेत्यांनी व्यक्त केले दुःख. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष ॲड उदय शेळके यांचे काल दि.११ रोजी दुःखद निधन झाले. ॲड उदय शेळके यांना काही दिवसापूर्वी ह्रदय विकाराचा झटका आला होता.त्या मुळे ते गेलीं पाच महिने पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता.त्यामुळें ते गेलीं पाच महिने कोमात होते.लीलावती रुग्णालयात परदेशी टीमने त्यांच्यावर उपचार केले होते.मात्र त्यात त्यांना यश आले नाही.शनिवार दि ११रोजी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले.त्या नंतर दोन वाजता त्यांचे निधन झाल्याचे हॉस्पिटल ने जाहीर केले.ते पारनेर तालुक्यातील पिप्री जलसेन गावातील रहिवाशी होते.त्यांच्या जाण्याने पारनेर तालुक्यातील तसेच संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे.त्यांच्या जाण्याने पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस चे मोठे नुकसान झाले आहे. हि त्यांची पोकळी कधीही भरून येणारी नाही. संपुर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या दुःखात डूबून गेला आहे. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. वडिलांच्या नंतर सहकारात त्यांनी भरीव काम केले. त्यामुळें त्यांना जिल्हा सहकारी बँकचे चेअरमन पद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन पारनेर तालुक्याचे लौकीकात भर टाकली. परंतु उदय शेळके यांचे अकाली जाणे मनाला चटका लावणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here