नागरिकांना लाईट मीटर न मिळाल्यास आंदोलन - अजय चितळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 11, 2023

नागरिकांना लाईट मीटर न मिळाल्यास आंदोलन - अजय चितळे.

 नागरिकांना लाईट मीटर न मिळाल्यास आंदोलन - अजय चितळे.


अहमदनगर - 
अहमदनगर नगर शहरात गरज असलेल्या सर्व नागरिकांना आठ दिवसात जर लाईटचे मीटर मिळाले नाही तर कार्यालयात कुठलीही पूर्व सूचना न देता लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे मध्य नगर शहर मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात श्री. चितळे यांनी म्हटले आहे की, अनेक महिन्यांपासून नागरिकांना नविन कनेक्शनसाठी तसेच मीटर खराब असल्यावर किंवा डिस्प्ले गेलेला असल्यावर नविन मीटरची आवश्यकता असते, परंतु ते त्यांना मिळत नाही. नागरिक अनेक महिनोमहिने स्थानिक ज्यनिअर इंजिनिअर यांच्याकडे व त्यांच्याऑफिसकडे चकरा मारीत असतात, परंतु त्यांना काही केल्या लवकर मीटर मिळत नाही. त्यांच्याकडे विचारणा केली असता मीटर शिल्लक नाही, मीटर अजून आलेले नाहीत, असे उत्तर वेळोवेळी मिळते. आपल्या कंपनीकडे मीटर शिल्लक का नसतात याबाबत समर्पक उत्तरे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देता येत नाहीत. मिटर नागरिकांना का मिळत नाही हे एक न उलगडणारे मोठे कोडेच आहे. मीटर फॉल्टी असल्यामुळे रीडिंग घेणारा व्यक्ती अंदाजे सरासरीने बिल टाकून मोकळा होतो व त्यामुळे ग्राहकांना नाहक जास्त वीज बिल भरावे लागत आहे. एक प्रकारे ग्राहकांना लुबाडण्याचे काम आपल्या कंपनीकडून होत असल्याचे श्री. चितळे यांनी म्हटले आहे. तातडीने लाईट मिटर द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment