प्रायमरी स्कूल निघोज येथे मातृ-पितृ दिवस उत्साहात संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 18, 2023

प्रायमरी स्कूल निघोज येथे मातृ-पितृ दिवस उत्साहात संपन्न.

 प्रायमरी स्कूल निघोज येथे मातृ-पितृ दिवस उत्साहात संपन्न.


निघोज -
ज्ञानांकुर शिक्षण संस्था संचलित सार्थक प्रायमरी स्कूल निघोज येथे मातृ-पितृ दिवस उत्साहात संपन्न झाला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांचे पाद्यपूजन करून औक्षण केले व आई वडीलांचे दर्शन घेतले.मातृ-पितृ भक्ती ही श्रेष्ठ भक्ती मानली जाते.भारतीय संस्कृतीमध्ये आई वडीलांना उच्च स्थान दिलेले आहे. आई वडीलांप्रती मुलांच्या मनामध्ये स्नेह, ममत्व, आदर, कर्तव्य वृद्धिंगत व्हावे व एक आदर्श पिढी उदयास यावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानांकुर शिक्षण संस्था संचलित सार्थक प्रायमरी स्कूलमध्ये मातृ-पितृ दिवस साजरा करण्यात आला. 
यावेळी सरपंच चित्राताई वराळ यांनी सांगीतले की,आज आपण पाहतोय संस्काराच्या अभावामुळे समाजातील असंख्य कुटुंबांच्या नात्यांमधील ओलावा कमी होवून त्या कुटुंबांमध्ये कटूता निर्माण झालेली आहे. आदर्श पिढी घडवायची असेल तर मुले लहान असतानाच त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करणे महत्त्वाचे आहे.सार्थक प्रायमरी स्कूलमध्ये ज्ञानदानाबरोबरच मुलांमध्ये संस्काराची पेरणी केली जाते याचा मला निघोज गावाची प्रथम नागरीक म्हणून अभिमान वाटतो.
ग्रामपंचायत सदस्या सुधामतीताई कवाद यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधताना सांगीतले की, कवी संदीप राठोड सर निघोज पंचक्रोशीमध्ये अनोख्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. ते सतत सार्थक प्रायमरी स्कूल व सार्थक कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात.आपण जे पेरणार तेच उगवणार. मुले निरिक्षणातूनच शिकत असतात आजच्या मातृ-पितृ पूजन दिवसातून मुलांच्या मनामध्ये आपल्या आई वडीलांविषयी आदर वाढेल त्याचबरोबर मुलांमध्ये आज्ञा पालनाची बीजे रोवली जातील यात शंका वाटत नाही.
यावेळी महेश भालेराव काका यांनी मंत्रोच्चार करत वातावरणामध्ये चैतन्य निर्माण केले. विधीवत आई वडीलांचे मनोभावे पुजन करून मुलांनी मातृ-पितृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तत्पूर्वी सार्थक प्रायमरी स्कूलचे संचालक राठोड सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा उपस्थित पालकांना करून दिला. आदर्श विद्यार्थी घडावा यासाठी वेगवेगळे उपक्रम ज्ञानांकुर शिक्षण संस्थेत राबवले जातात याची माहीती दिली.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून पालकांनी स्कूलचे कौतुक करत मुलांच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व मुलांच्या भविष्याची चिंता नसल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी सरपंच चित्राताई वराळ, ग्रामपंचायत सदस्या सुधामतीताई कवाद, भारतीय जनता पार्टीचे ओबीशी सेल तालुकाध्यक्ष मनोहर राऊत, युवा उद्योजक अप्पाशेठ वराळ, गोकर्ण उद्योग समूहाचे संचालक गोरखशेठ लामखडे, पत्रकार सचिन जाधव, महेश भालेराव काका,राजु लंके, मनिषा लंके, प्रियंका राठोड,निलेश रसाळ, प्रियंका रसाळ, विजय रसाळ, भाग्यश्री रसाळ, मकरंद भालेराव, सरस्वती भालेराव, योगेश भुकन, सुप्रिया भुकन, प्रविण वराळ, रेष्मा वराळ,  पप्पू रसाळ, लता रसाळ, चेतन रसाळ,विद्या रसाळ,राणी राऊत, संदेश गायकवाड, शिल्पा गायकवाड, फिरोज हवालदार, शाबिरा हवालदार, उषा जाधव, संतोष तनपुरे, सोनाली तनपुरे,मिना लाळगे, प्रचिता लाळगे, भाग्यश्री रसाळ, कासूबाई कावरे, हिराबाई भुकन, संतोष उपाध्ये, अमृता उपाध्ये,तसेच विद्यार्थी, पालक,सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment