नगर शहरातील धक्कादायक घटना नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाकडून आईस हातोड्याने मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 4, 2023

नगर शहरातील धक्कादायक घटना नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाकडून आईस हातोड्याने मारहाण.

 नगर शहरातील धक्कादायक घटना नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाकडून आईस हातोड्याने मारहाण.


अहमदनगर :
 नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाने आईला हातोड्याने मारल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. आई काम करत असलेल्या दुकानात येऊन मुलाने तिला हातोड्याने मारहाण केली. शहरातील मार्केटयार्ड येथील एका दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. राज बाळासाहेब बोरगे असे 26 वर्षीय गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. मनिषा बाळासाहेब बोरगे असे हल्ला करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मनिषा या मार्केटयार्ड येथील एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करतात. त्यांचा मुलगा राज हा त्यांना भेटण्यासाठी दुकानात आला. त्यावेळी त्याने मला नवीन मोबाईल घेऊन दे, असा आग्रह धरला.

यावर आता पैसे नाहीत, तुला याआधीच मोबाईल दिला होता, आता तू घरी जा, असे सांगून मनिषा यांनी मुलाला समजावून सांगितले. मात्र मोबाईल घेऊन दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही, असे मुलाने सांगितले.

यामुळे संतापलेल्या मुलाने चारित्र्यावर संशय घेत आईच्या पायावर हातोडा मारला. त्यानंतर दुकानातील स्टीलचा ग्लास आईच्या डोक्यात मारत आईला जखमी केले.

यानंतर महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून, ती घरी एकटीच राहते. आरोपी मुलगा हा त्याच्या आजीकडे राहतो.

No comments:

Post a Comment