आमची आजी संस्काराची शिदोरी कै. गं. भा. नानीबाई गोपाळराव पठारे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 10, 2023

आमची आजी संस्काराची शिदोरी कै. गं. भा. नानीबाई गोपाळराव पठारे.

आमची आजी संस्काराची शिदोरी कै. गं. भा. नानीबाई गोपाळराव पठारे.
आजीचा जन्म भाळवणी येथे चेमटे घराण्यात 1925 मध्ये झाला माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने कुटुंबामध्ये चार भाऊ चार बहिणी असून नाणीबाई या भावंडांमध्ये थोरल्या असल्याने सर्व भावंडांची जबाबदारी यांच्यावर होती. परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. घरातील घरकाम व कुटुंबातील काम करून त्यांचे वयाच्या 17 व्या वर्षी 1942 मध्ये वडील देवजी कोंडाजी चेमटे यांनी पारनेर तालुक्यातील वडुले येथील पठारे घराण्यातील यशवंतराव पठारे पाटील यांचे चिरंजीव गोपाळराव यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पठारे परिवार हा सामाजिक कामात असल्याने व कुटुंबात गावची पाटील की असल्याने घरात दैनंदिन लोकांची ये-जा जास्त असे. आजी या सर्वांची आपुलकीने विचारपूस करून काय हवे काय नको  ते पाहत असत. पुढे जाऊन त्यांना तान्हाजी व पंढरीनाथ असे दोन मुले झाली. आजी स्वतः अशिक्षित असताना आपली मुले शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हावेत यासाठी नानी बाईंनी मोलमजुरी करून मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न केले. 1952 साली पती गोपाळराव पाटील यांचे निधन झाले. त्यावेळी मुले थोरला मुलगा पाच वर्षांचा तर धाकटा मुलगा एक वर्षाचा होता. ऐन पंचवीशीच्या तारुण्यात मुलांचे पितृछत्र हरपल्यानंतर नानीबाईंनी स्वतः या मुलांचे आई-वडील या दोघांची जबाबदारी घेऊन मुलांना वाढवले. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आपली मुले शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या माहेरी भाळवणी येथे आपल्या भावाकडे पाठवले. मुले तान्हाजी व पंढरीनाथ यांचे महाविद्यालयात शिक्षण भाळवणी येथे आपल्या मामाच्या गावी झाले. पुढील शिक्षण अहमदनगर येथे दोन्ही भावंडांनी पदवीचे बीए शिक्षण घेतले. वडुले गावातील हे भावंडे पहिले पदवीधारक होते. चेमटे परिवाराची गरीबी असताना देखील आपल्या भाच्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मामांची मोठे योगदान होते. सर्व नातेवाईक व गावांमध्ये पाटलीन बाई म्हणूनच त्यांची विशेष ओळख होती.
नानीबाईंचा थोरला मुलगा तान्हाजी हे पदवीधारक होऊन ते शिक्षक झाले. धाकटा मुलगा पदवीधर असताना देखील आईच्या आग्रहाखातर व घरची शेती खूप असल्याने त्यांनी शेती सांभाळली. मुलगा तान्हाजी पठारे सर यांचे शेजारील पानोली गावात भगत-राजे या कुटुंबातील शकुंतला राजे-भगत यांच्याशी १९७० साली विवाह झाला. पंढरीनाथ पठारे यांचा विवाह पळवे येथील पळसकर कुटुंबातील हिराबाई हरिभाऊ पळसकर यांच्याशी १९७६ साली झाला. पुढे तान्हाजी सर यांना 2 मुले 1 मुलगी व पंढरीनाथ पठारे यांना 3 मुले 1 मुलगी असा परिवार आहे.
घरची परिस्थिती हालाखीच्या असल्याने तान्हाजी पठारे सर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थांमध्ये संविदने, करडे, नाहवरे वाघोली या ठिकाणी शैक्षणिक सेवा करत असताना कुटुंबातील स्वतःची मुले व भावाची मुले, मुली अशा सात भावंडांचे शिक्षण तान्हाजी पठारे सर यांनी पूर्ण केले. यामध्ये तान्हाजी पठारे यांची थोरली मुलगी विजया शिक्षिका, बाळासाहेब हे सुपे येथे डॉक्टर, श्रीकांत पठारे हे पारनेर येथे डॉक्टर असून पारनेर पंचायत समिती सदस्य व शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख आहेत. त्याचप्रमाणे पंढरीनाथ पाटील यांचे थोरले चिरंजीव प्रमोद हे मेडिकल व्यवसाय व हॉटेल व्यवसाय सांभाळत आहेत. संतोष हे एम-टेक होऊन बँक ऑफ बडोदा मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. धाकटे चिरंजीव विलास हे उत्कृष्ट रणजी खेळाडू आहेत व ते सध्या पुणे या ठिकाणी मेडिकल व्यवसाय व क्रिकेट अकॅडमी चालवतात. एक मुलगी सुरेखा ही उत्कृष्ट गृहिणी आहेत.
आमची आजी ही आर्थिक बाबतीत जरा कमजोर असली तरी ती मोठ्या मनाची होती अत्यंत गरीब परिस्थितीत आमचे वडील, काका यांना उच्चशिक्षित केले आम्हा नातवंडांना एवढ्या यशापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे आजी नानीबाईंचा मोठा वाटा आहे. जगाच्या पाठीवर कितीही श्रीमंत झाले तरी आपली आपल्या काळ्या आईशी असलेली नाते तुटू द्यायचे नाही हे संस्कार आजीने दिल्याने आजही वडुले गावात मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट अशी शेती नातवंडांनी फुलविलेली आहे. नातवंडे उच्चशिक्षित होऊन सर्वांनी आपापले उद्योग व्यवसायात नाव कमावलेले व शेती देखील उत्कृष्ट फुलवलेली हे पाहून आजींनी केलेल्या कष्टाचे फळ सार्थक झाल्याचे आजींनी अनेकदा बोलून दाखवले.
अशा या संस्कारक्षम शिदोरी देणाऱ्या आजी नानीबाई आज आम्हाला सोडून गेल्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शोकाकुल
तानाजी गोपाळराव पठारे, मुलगा
डॉ.बाळासाहेब पठारे, नातु 
डॉ.श्रीकांत पठारे, नातू
प्रमोद पठारे, नातु
संतोष पठारे, नातु
विलास पठारे, नातू
विजया ठुबे, नात
सुरेखा पोटघन, नात

No comments:

Post a Comment